जाहिरात

पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा

Pune Drugs Case : एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज घेणारं पुणे अशी होत आहे.

पुण्यात चाललंय काय ! सांस्कृतिक राजधानीला पडलाय ड्रग्जचा विळखा
Pune Drug Case
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

एकेकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज घेणारं पुणे अशी होत आहे. या पुण्यातल्या  तरुणाईला झालंय काय असा प्रश्न आता वारंवार उपस्थित राहत आहे. पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मेफिडरॉनचा पुण्यामध्ये सापडलेला साठा आणि त्याचा थेट कनेक्शन हे इंग्लंड पर्यंत होतं.आता तर सर्रासपणे पब मध्येच ड्रग्ज मिळत आहे त्याच्यामुळे पुण्याचा उडता पंजाब झाला आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुण्यामध्ये दिवसेंदिवस पब संस्कृती फोफावत चाललीय. ज्यामध्ये अल्पवयीन मुलामुलींबरोबरच,  पुरुष, महिला आणि विदेशी लोकांचा देखील समावेश आहे  पोर्शे कार अपघातानंतर पुणे प्रशासनाने पुण्यातील 68 बारवर कारवाई केली होती. या प्रकरणात बार मालक यांना समज देण्यात आली होती. त्यानंतरही या सर्व नियमांना धाब्यावर बसून शनिवारी रात्री पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओनं पुन्हा एकदा पब मालक चालक आणि ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला.

यापूर्वी देखील पुण्यातील पोलीस हे ॲक्शन मोडवर आले होते. त्यांनी पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्ज पकडले होतें असं असताना आता थेट सर्रासपणे ड्रग्जची विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित हॉटलेमधून सर्रास ड्रग्ज घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना दिसतं आहे.  या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये बारमालकांसह डीजेचाही समावेश आहे. 

( नक्की वाचा : पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित )
 

पुणे शहरात सापडेलं ड्रग्ज

1) नोव्हेंबर 2022 पासून ऑक्टोबर 2023 मध्ये 155 गुन्हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह बाकी पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्ट
अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत

2) 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 155 गुन्हे दाखल झाले आहेत. यात 215 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ज्यामध्ये 17 कोटी 84 लाख 46 हजार 2055 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता अशी प्रार्थमिक माहिती समोर आली होती

 या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी गांजा, कोकेन, चरस, एमडी, मशरूम, कॅथा इडुलीस खत, दोडा पावडर, एमडीएमए, अफिम, ब्राऊन शुगर, एलएसडी पेपर, हॅश ऑईल, ओझीकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझिप, टॅब निद्रावेट, हेरॉईन आणि मॅस्केलाईन ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणातील एकूण 215 आरोपींमध्ये 190 पुरुष, 15 महिला, तर 10 परदेशी नागरिकांचा समावेश होता 

3) 2024 मार्च महिन्यात 3 हजार 674 कोटींचे एमडी जप्त मार्च 2024 मध्ये पुणे पोलिसांनी कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. यावेळी 3 हजार 674 कोटी रुपयांचे तब्बल 1 हजार 8360 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले होते.

( नक्की वाचा : पुण्यात पुन्हा 'उडता पंजाब', नामांकित हॉटेलमधील स्टिंग ऑपरेशन आलं समोर )
 

पुण्यातील 'एल थ्री'चं नेमकं प्रकरण काय ?

पुणे शहरातील मध्यवर्ती भाग आणि नेहमी गजबजलेला भाग म्हणून पुण्यातील फर्ग्युसन रोड हा प्रसिद्ध आहे.  पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंट साठी येथे येतात, आणि पॉपच्या नावाखाली ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. 

पुण्यातील अशाच एका एल थ्री हॉटेलमधील पार्टीत, हॉटेलच्या बाथरूममध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेट जवळ बसून हे दोन तरुण ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात.त्यांच्या जवळचे हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्ज असावे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे.

या प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आला आहे परंतु काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी पब वर कारवाई करत पब बंद करण्याचे जे आदेश काढले होते आणि जे नियम काढले होते ते सर्व धाब्यावर बसवून पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. 

( नक्की वाचा : पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खासदार मोहोळ आक्रमक; म्हणाले, "पुण्याची बदनामी सहन केली जाणार नाही" )
 

कशी बदलली संस्कृती ?

गेल्या दहा वर्षात पुण्यातील विकासात विकासाच्या कामाबरोबरच पुण्यातील जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतोय.  पुण्याची ओळख ही सांस्कृतिक राजधानी बरोबरच आता आयटी हब म्हणून देखील करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळेच सहाजिकच पुण्याची बदलती जीवन शैलीमध्ये बदल दिसायला लागलेले आहेत. 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या अनेक वर्षांच्या पुण्यात राहणाऱ्या श्रीमंत लोकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, या आकडेवारीनुसार तीनपैकी एक कोट्याधीश आहे. त्याच वेळी, गुन्हेगारी नोंदी असलेल्या लोकांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. 2009 मध्ये केवळ 16 टक्के पुण्यातील लोक करोडपती होते. 2014 च्या सर्वेनुसार पुण्यातील 27 टक्के करोडपती आहेत कोट्यधीश उमेदवारांची संख्या गेल्या 15 वर्षांत जवळपास दुप्पट झाली असून,  आता तर ही संख्या 31 टक्के झाली आहेः 

ही सगळी आकडेवारी पाहता, 5 कोटी रुपये आणि त्याहून अधिक संपत्ती असलेले लोक 2019 मधील 11 टक्के होती तर 2024 च्या सर्वेक्षणानुसार ती 12.4 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे सहाजिकच इझी मनी आणि वेगवेगळे छंद जोपासण्यासाठी मुलांकडे मुबलक पैसा उपलब्ध आहे,त्यामुळे या सर्व प्रकरणाला कुठेतरी पालकही जबाबदार असल्याचं मानलं जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com