'मी तिचा गळा दाबला', महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आरोपीने आईला सांगितलं सत्य

29 वर्षीय महालक्ष्मीच्या (Mahalaxmi Murder) हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बंगळुरू:

29 वर्षीय महालक्ष्मीच्या (Mahalaxmi Murder) हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. महालक्ष्मीची हत्या केल्यानंतर आरोपी मुक्तीरंजन रॉय  आपल्या घरी गेला होता. घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या आईकडे हत्येचा गुन्हा कबुल केला होता. त्य़ाने हत्या का केली याबाबत आईला सांगितलं होतं. आरोपी मुक्तीरंजनने आपल्या आईला खरं सांगितल्यानंतर आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह ओडिशाच्या भद्रक जिल्ह्याच्या भुइंपूर गावाजवळ आढळला होता. 

मुक्तीरंजनच्या आईने सांगितलं की, मंगळवारी रात्री साधारण १० च्या सुमारास मुक्तीरंजन घरी आला होता. तो खूप त्रस्त दिसत होता. त्याने मला सांगितलं की, माझ्याकडून एक चूक झालीये. त्याने सांगितलं की, मी एका महिलेची हत्या केलीये. आईने त्याला हत्येचं कारण विचारलं. यावर तो म्हणाला, महालक्ष्मीने माझे पैसे आणि एक सोन्याची चैन घेतली होती. 

नक्की वाचा - महिलेचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुख्य आरोपीचाही धक्कादायक शेवट, दुचाकीशेजारी आढळला...

आरोपीच्या आईचा दावा...
आरोपी मुक्तीरंजनच्या आईने दावा केला की, पीडितेच्या तक्रारीवर कर्नाटक पोलीस यापूर्वी मुक्तीरंजन यांना घेऊन गेले होते. मात्र एक हजार देऊन त्याची सुटका केली होती. मुक्तीरंजनच्या आईने पुढे सांगितलं की, या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पीडितेच्या सांगण्यावरून काही तरुणांनी त्याला धमकी दिली होती. यानंतर तो महिलेच्या घरी गेलो, येथे दोघांमध्ये मारहाण झाली. यातच त्याने महालक्ष्मीचा गळा दाबून हत्या केली.  

आईने पुढे सांगितलं की, मुक्तीरंजनने मृतदेहाचे तुकडे केल्याबद्दल काहीच सांगितलं नाही. घटनेबद्दल सांगितल्यानंतर मुक्तीरंजनच्या आईला धक्का बसला. घरातून निघताना मुक्तीराजनने एक ग्लास पाणी प्यायला आणि घराबाहेर पडला. 

महालक्ष्मी 4 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहत होती...
महालक्ष्मीचा भाऊ उक्कम सिंहने सांगितल्यानुसार, तिचं कुटुंबीय नेपाळच्या कठंद राज्यातील टीकापूर गावातील राहणारा आहे. 30 वर्षांपूर्वी आई-वडील कामासाठी बंगळुरूत आले आणि येथेच राहू लागले. महालक्ष्मीचं लग्न नेलनंगलामध्ये राहणाऱ्या हेमंत दास सोबत झालं होतं. हेमंत एका मोबाइल एक्सेसरीजच्या दुकानात काम करतो. महालक्ष्मी एका मॉलमध्ये काम करीत होती. त्यांना चार वर्षांची मुलगीही आहे. महालक्ष्मी आणि हेमंत साधारण चार वर्षांपासू वेगळं राहत होते. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यांची मुलगी हेमंत यांच्यासोबत राहत होती. महालक्ष्मी मात्र ऑक्टोबर 2023 पासून बसप्पा गार्डनजवळील पाइपलाइन रोडजवळ एका भाड्याच्या घरात राहत होती.