पूजा खेडकरनंतर आता पुण्यात आणखी एका बनावट IAS अधिकारी महिलेचा धुमाकूळ

पुण्यातील लोणी काळभोर परिसरात या बनावट आयएएस अधिकाऱ्याने अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पूजा खेडकरनंतर आता पुण्यात आणखी एका बनावट IAS अधिकारी महिलेचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. रेणुका करनुरे असं महिलेचं नाव असून तिने IAS असल्याची बतावणी करत महिलांना व्याजाने पैसे देऊन फसवणूक केली. 'मी आयएएस अधिकारी असून माझ्या नादी लागू नको...' असं म्हणत रेणुका करनुरे पैसे व्याजाने दिलेल्या महिलांना धमकावत होती. एका पीडित महिलेला करनुरेने 2 लाख 68 हजार दिले होते. त्याबदल्यात ती व्याज म्हणून साडेचार लाखाची मागणी करत होती. याप्रकरणी करनुरेच्या विरोधात लोणी काळभोरमध्ये अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'मी IAS आहे, माझ्या नादी लागली तर कामाला लावेन'; पुण्यात बनावट महिला अधिकाऱ्याचा धुमाकूळ
एकीकडे वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर येत असताना दुसरीकडे पुण्यात एका बनावट आयएएस अधिकारी महिलेने धुमाकूळ घातल्याचं उघडकीस आलं आहे. या महिलेने खासगी सावकारी सुरू केली असून व्याजाच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक  केल्याचं समोर आलंय. तिच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेलाही तिने धमकी दिल्याचं उघड झालं. रेणुका ईश्वर करनुरे असं या बनावट आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात या बनावट आयएएस अधिकाऱ्याने अनेक महिलांना व्याजाने पैसे देत त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बनावट IAS करायची खासगी सावकारी
पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिलेने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दरमहा दहा टक्क्याने पैसे उकळले आहेत. या प्रकरणी रेणुका करनुरेच्या विरोधात एका 31 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - ACB कडून मोठी कारवाई; मंत्र्याला लाच दिल्या प्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढल्या!

व्याजासाठी महिलेला धमकावलं
या पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने बनावट आयएएस अधिकारी रेणुकाला आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये दिले असताना सुद्धा रेणुकाने आणखी चार लाख 55 हजार रुपयांची मागणी करत धमकवण्यास सुरुवात केली. 

Advertisement

"मी आयएएस अधिकारी आहे, माझ्या नादाला लागू नको. तुला कामाला लावेन, माझे पैसे तू ताबडतोब दे" असं म्हणत धमकवण्यास सुरुवात केली. या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावट आयएएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर रेणुकाची अनेक प्रकरणे आता समोर येत आहेत.