वादग्रस्त परिविक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) वादात अडकल्यानंतर आता त्यांचे वडील दिलीप खेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी सुरू झाली आहे. NDTV मराठीच्या हाती आलेल्या एक्स्लुझिव्ह माहितीनुसार, दिलीप खेडकर यांची 11 आणि 12 जुलै रोजी ACB ने चौकशी केली आहे. दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या अॅडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला. त्यांच्या 47 पानी तक्रारीत शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम आणि मंत्री दीपक केसरकरांचाही उल्लेख आहे.
मंत्री असताना रामदास कदमांनी बदलीसाठी 2 कोटी रुपये घेतल्याचा आरोप गंभीरे यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना कदमांनी आरोप फेटाळले असून गंभीरेवर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभााकडून खुली चौकशी सुरू असून दिलीप खेडकर यांच्या विरोधात बेहिशोबी संपत्ती जमा केल्याची तक्रार आहे. तक्रारदार वकील तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्हीला याबाबत माहिती दिली. खेडकर यांच्याकडं 8-10 आलिशान वाहनं आहेत. 14 विविध ठिकाणी जमिनी खेडकर कुटुंबाकडे जमिनी आहेत. या प्रकरणात ACB योग्य रितीनं तपास करत नसल्याचा आरोपही तानाजी गंभीरे यांनी केलाय.
नक्की वाचा - पूजा खेडकरांच्या वडिलांनी 2 कोटींची लाच दिली ते मंत्री कोण? तक्रारदारांनी सांगितलं नाव
धक्कादायक बाब म्हणजे तानाजी गंभीरे यांनी आपल्या 47 पानांच्या तक्रारीमध्ये तत्कालीन मंत्री रामदास कदम आणि दीपक केसरकर यांचाही उल्लेख केला आहे. दिलीप खेडकर यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांची, गाड्यांची , जमिनीची संपत्तीची यादी एसीबीकडे सादर करण्यात आली आहे. पूजा खेडकर प्रकरण बाहेर आल्यानंतर 11, 12 आणि 13 हे तीन दिवस पुणे ACB कडून चौकशी झाल्याची माहिती आहे. खात्यातून निलंबित करताना प्रदूषण मंडळाने खेडकर यांनी 50 हजारापासून 20 लाखापर्यंत लाच मागितल्याचं सांगितलं असून सरकारकडूनच निलंबित आदेशात लाचेचा उल्लेखही करण्यात आल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world