कोल्हापूर हादरलं! आईच्या विरहात बहिण- भावाचं टोकाचं पाऊल

आईचा विरह या दोन्ही भाऊ बहिणींना सहन झाला नाही. शेवटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्र संपवली.

Advertisement
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

कोल्हापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सख्ख्या भाऊ बहिणीने तलावात उडी घेत आत्महत्या केलीय. त्यांच्या आईचे अडीच महिन्या पूर्वी निधन झाले होते. आईचा विरह या दोन्ही भाऊ बहिणींना सहन झाला नाही. शेवटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्र संपवली. या घटनेनं नंतर संपुर्ण कोल्हापुरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

भूषण निळकंठ कुलकर्णी व भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे सख्खे भाऊ बहिण आहेत. कोल्हापुरच्या नाळे कॉलनीत ते राहायला होते. दोघेही अविवाहीत आहे.अडीच महिन्यांपूर्वीच त्यांच्या आई पद्मजा यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते खचून गेले होते. ते नैराश्यात गेले होते. आई शिवाय जिवन व्यर्थ आहे असं त्यांनी मन बनवलं होतं. त्यातूनच आत्महत्या करण्याच विचार त्यांच्या डोक्यात आला. दोघांनीही निर्णय घेतला. एकत्रीत जिवन संपवायचं असं त्यांनी ठरवलं. 

ट्रेंडिंग बातमी - शिवबंधन सोडलं, ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश, ठाकरेंच्या वरळीत काय घडलं?

आत्महत्या करण्या पूर्वी त्यांनी एका सुसाईड नोट लिहीली. त्यात त्यांनी आपण आत्महत्या का करत आहोत याचे कारण लिहीले. जी सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे, त्यात त्यांनी  आईच्या मृत्यूचा विरह सहन झाला नाही. त्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत आहोत. ही सुसाईड नोट लिहून त्यांनी शहरातील भवानी तलावात उडी घेवून आपले जिवन संपवले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

विशेष म्हणजे हे दोघेही भाऊ बहिण  उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये  या घटनेला कुणालाही जबाबदार धरू नये, असे स्पष्ट पणे लिहीले आहे. अडिच महिन्या पूर्वीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. यातून कुलकर्णी कुटंब सावरत असतानाच आता  या दोन्ही बहिण भावाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे कुलकर्णी कुटुंबावर दुखा:चा डोंगरच कोसळला आहे. 

Advertisement