जादूटोण्याच्या संशयावरून संभाजीनगरात खळबळ; बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर अघोरी कृत्य

Chhatrapati Sambhajinagar News:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Chhatrapati Sambhajinagar News: या प्रकारामुळे बिडकीन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar News:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बिडकीन जवळील कृष्णापूर येथे एका घरासमोर अघोरी जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. 

कृष्णापूर येथील रहिवासी आणि बांधकाम ठेकेदार इनायत पठाण हे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरासमोर दोन ठिकाणी रांगोळी काढलेली दिसली. त्या रांगोळीवर कोहळा, कडू लिंबाचा पाला, मिरची आणि हळद-कुंकू ठेवलेले होते. हे पाहिल्यानंतर कोणीतरी जादूटोणा केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

( नक्की वाचा : पोलिसांच्या सायरनचा वापर करून दरोडेखोरांनी रचला कट; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उधळला डाव )

पठाण यांनी तात्काळ या घटनेची माहिती बिडकीन पोलिसांना दिली. सहायक निरीक्षक निलेश शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली. मात्र, पठाण यांनी पोलिसांसमोरच घरासमोरील सर्व साहित्य झाडूने काढून टाकले. त्यांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे, याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

या प्रकारामुळे बिडकीन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात आजही अशा जादूटोण्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे हा प्रयोग नेमका कोणी केला, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. पण, तक्रार दाखल न झाल्याने पोलिसांना पुढील तपास करणे शक्य झाले नाही.

Advertisement