सुनिल दवंगे, अहिल्यानगर:
Sachin Gujar kidnapped CCTV: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. राज्यभरात प्रचारसभा, फोडाफोडी अन् मतांची जुळवाजुळवी करण्यात नेते, कार्यकर्ते मग्न आहेत. अशातच अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हा अध्यक्षाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे, या अपहरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेस नेत्याचं अपहरण, बेदम मारहाण....
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना आपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटनाअहिल्यानगरच्या श्रीरामपूर मध्ये घडली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनाही बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांच्या अपहरणाचा व्हिडिओही सध्या सोशल माडियावर व्हायलल होत आहे.
Raj Thackeray: 'मराठी माणसा जागा हो', राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट, केंद्रीय मंत्र्यांवर संतापले
सचिन गुजर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. याचवेळी एक चारचाकी गाडी त्यांच्या जवळ येऊन थांबली. दोघांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये कोंबले अन् अपहरण केले. अपहरणानंतर त्यांना बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मारहानीनंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
काँग्रेस नेते संतापले....
या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहे. राज्यात गृहखाते आणि पोलिस काय करत आहे? वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. पोलिस काय करतात हा प्रश्न पण आता पडत नाही कारण ते निष्प्रभ ठरले आहेत. गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या प्रकरणी आरोपींना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहे. राज्यात गृहखाते आणि पोलिस काय करत आहे? वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. पोलिस काय करतात हा प्रश्न पण आता पडत… pic.twitter.com/8nTBkKAfuM
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) November 26, 2025
दरम्यान, सचिन गुजर यांना मारहाण झाल्यानंतर काँग्रेसचे श्रीरामपुरचे आमदार हेमंत उगले, काँग्रेसचे नेते करण ससाने श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. याप्रकरणाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही गंभीर दखल घेतली असून ते श्रीरामपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world