- कोलम नागनाथ काळे ही अलहिल्यानगरची रिल स्टार असून तिचे इंस्टाग्रामवर पन्नास हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत
- कोलम आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर बस स्थानकांवरून चोरी करत होते
- वाढलेल्या चोरीच्या तक्रारींमुळे पोलीसांनी तपास सुरू केला आणि कोमलला बस स्थानकातून अटक केले.
प्रसाद शिंदे
कोण कधी काय करेल याचा नेम नसतो. कुणाच्या चेहऱ्यावर जावू नये असं म्हणतात ते ही खरचं म्हणावं लागेल. कधी कधी काही गोष्टींची सवय लागते आणि भलेभले त्याच्या आहारी जातात. झटपट पैसे कमवणे आणि त्यातून आपले शौक पूर्ण करणारी एक जमात झपाट्याने वाढत आहेत. अशा गोष्टी मुळेच ते वाईट मार्गाला कधी लागतात हे त्यांनाच समजत नाही. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये समोर आली आहे. ही घटना एका रिल स्टारबाबत आहे. लोकप्रिय होत असतानाच ती नको त्या गोष्टींच्या नादी लागली आणि शेवटी पोलीसांच्या जाळ्यात अलगद सापडली.
कोलम नागनाथ काळे ही तरुणी अलहिल्यानगरची रहिवाशी आहे. विशेष म्हणजे ती रिल स्टार आहे. दिसायला देखणी शिवाय रिल स्टार यामुळे तिचे फॉलोव्हर्सही जास्त आहेत. इंस्टाग्रामवर तिचे पन्नास हजार पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. हा तिचा दाखवण्याचा चेहरा होता. पण खरा चेहरा काही तरी वेगळाच होता. सुजित राजेंद्र चौधर ही तिचा प्रियकर होता. त्याच्या सोबत मिळून हे दोघे ही चोरी करायचे. ही चोरी ते बस स्थानकांवरून करत होते. त्यांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी चोरी करण्याचा सपाटा लावला होता.
वाढलेल्या चोऱ्या या मुळे पोलीसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. दिवसेंदिवस तक्रारी ही वाढत होत्या. त्यात या चोऱ्या कोण करत आहे याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे पोलीसांनी आपले जाळे विणले. खबऱ्यांना अॅक्टीव्ह करण्यात आले. शेवटी पोलीसांच्या तपासाला यश आले. एका खबऱ्या मार्फत कोमलची माहिती पोलीसांना मिळाली. ती चोरी करण्यासाठी पार्थर्डी बस स्थानकात आल्याचं पोलीसांना समजलं. त्यानुसार सापळा रचण्यात आला. त्यावेळ कोमल तिथे दिसून आली. संधी मिळताच पोलीसांनी तिला ताब्यात घेतलं.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर पोलीसांनी आपल्या पद्धतीने कोमलकडजे चौकशी केली. त्यानंतर ती पोपटा सारखी बोलू लागली. तिने चोरी करत असल्याचे कबुल केले. शिवाय चोरी का करत आहे याची ही माहिती पोलीसांनी दिली. त्याच बरोबर या चोऱ्या आपण एकट्याने केल्या नाहीत तर आपल्या सोबत प्रियकर सुजित राजेंद्र चौधर असल्याचं ही तिने पोलीसांना सांगितलं. आपण केलेल्या चोरीचा सर्व माल आपण सुजितकडेच देत असल्याचं ही तीने कबुल केलं.
तो शेवगावला असल्याची माहिती पोलीसांनी तिने दिली. त्यानुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी सुजितला शेवगाव येथून अटक केली. अशा पद्धतीने ही बंटी- बबलीची जोडी गडा आड झाली. त्या आधी या जोडीकडून पोलिसांनी 9 लाख 35 हजार 230 किमतीचा ऐवज जप्त केला आहे. यात 6.5 तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांहून अधिक किमतीचा आयफोन 17 प्रो मॅक्स आणि इतर रोख रक्कम व मोबाईलचा समावेश आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पाथर्डी पोलिस करीत आहेत.