- कॅप्टन बाबा हरभजन सिंह हे भारतीय सीमांचे रक्षण करणारे शहीद सैनिक असून मृत्यूनंतरही देशसेवेसाठी ऑन ड्युटी आहेत
- हरभजन सिंह यांचा जन्म पंजाबमध्ये झाला, ते भारतीय लष्करात १९६६ मध्ये भरती झाले.
- १९६८ मध्ये नाथू ला खिंडीजवळ त्यांचा खच्चर घेऊन जाताना अपघात झाला आणि ते शहिद झाले.
भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आपले लाखो सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. भारतीय सीमेवर कोणाताही ऋतू न पाहता ते एखाद्या पहाडा प्रमाणे तिथे उभे असतात. डोळ्यात अंजन घालून ते भारतीय सीमांचे रक्षण करतात. प्रसंगी ते आपल्या जीवाची बाजी ही लावतात. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्याला देशसेवेसाठी वाहून घेतात. पण एक असा सोल्जर आहे जो शहीद झाल्यानंतर ही भारत मातेची सेवा करत आहेत. मृत्यू नंतर ही हा सैनिक ऑन ड्युटी असतो. तुम्हाला यावर विश्वास पटणार नाही. कुणालाच पटणार नाही. पण परिस्थितीने हे खरं असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळेच या मृतय सोलजरला नियमित पगार, सुट्टी आणि अगदी प्रमोशन ही दिलं गेलं. ही धक्कादायक पण तेवढीच रोचक कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
या सोल्जरचं नाव आहे कॅप्टन बाबा हरभजन सिंह (Baba Harbhajan Singh). हे भारतीय लष्करातील एक वीर सैनिक होते. जे शहीद झाल्यानंतरही देशसेवा करत असल्याची श्रद्धा आहे. भारतीय सैन्य दलात त्यांची एक खास ओळख आहे. हरभजनसिंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 रोजी पंजाबच्या गुजरावाला इथं झाले. फाळणीनंतर त्यांचे गाव पाकिस्तानात गेले.पण हरभजनसिंग यांचे कुटुंब भारतात आले अन् भारतातच स्थायिक झाले. हरभजन सिंग यांना पहिल्या पासूनच देश सेवेची आवड होती. त्यामुळे त्यांनी भारतीय लष्करात जाण्याचा निर्णय घेतला होता.
नक्की वाचा - Success Story: ट्रींग...ट्रींगवाल्या फोनमध्ये Bluetooth, रेट्रो फोनला टेक्नॉलॉजीचा तडका
त्यानुसार 9 फेब्रुवारी 1966 रोजी ते पंजाब रेजिमेंटमध्ये (Punjab Regiment) सैनिक म्हणून भरती झाले. त्यांची देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टींग झाली. सिक्कीम मधील नाथू ला पासवर ते तैनात होते. तिथली स्थिती अतिशय बिकट होती. त्यात अवस्थेत ते तिथं तैनात होते. 4 ऑक्टोबर 1968 रोजी सिक्कीममधील नाथू ला (Nathu La) खिंडीजवळ ते खच्चर घेऊन जात होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस होत होता. परिस्थिती बिकट होती. त्याच वेळी त्यांचा पाय घरसला आणि ते खोल दरीत पडले. त्यांचा मृतदेह सापडत नव्हता. ते पळून गेले असं सुरूवातीला समजलं गेलं. पण त्यांच्या सहकाऱ्यांचा त्यावर विश्वास नव्हता.

तीन दिवस झाले तरी त्यांचा मृतदेह भारतीय लष्कराच्या हाती लागला नाही. पण एक दिवस हरभजन सिंग यांच्या एक मित्राच्या स्वप्नात ते आले. त्यांनी आपला मृत्यू झाल्याचं सांगितलं. शिवाय आपला मृतदेह कुठे आहे हे ही त्याला सांगितलं. ही बाब त्याने आपल्या वरिष्ठांना सांगितली. त्यावर काहींनी चेष्ठा केली. पण काहींनी एकदा पाहूया म्हणून स्वप्नात हरभजन यांनी जे ठिकाण सांगितलं होतं त्या ठिकाणी जावून काही सैनिकांनी तपास घेतला. तर आश्चर्य. त्याच ठिकाणी हरभजन सिंग यांचा मृतदेह आढळून आला. हे पाहून सर्वच जण आवाक झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे एक आश्चर्य वाटले. पण खऱ्या गोष्टी पुढे घडणार होत्या. त्या घडत गेल्या. त्यातून हरभजन सिंग यांचा आत्मा या परिसरात आहे आणि तो भारतीय सीमेचे रक्षण करतो हे मान्य केले गेले. त्यासाठी काही घटना ही कारणीभूत ठरल्या.
मृत्यूनंतर बाबा हरभजन सिंह यांचा आत्मा सीमेवर गस्त घालतो असे मानले जाते. त्याचा प्रत्यय भारतीय सैनिकांना या भागात गस्त घालताना आला आहे. शिवाय भारतीय सैनिकांना चीनच्या संभाव्य धोक्याची किंवा हल्ल्याची आगाऊ सूचना ही ते देत होते. अशी भारतीय सैन्यामध्ये आणि स्थानिक लोकांमध्ये तीव्र श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे, भारतीय लष्कर आजही त्यांना एक सैनिक म्हणून मान देते. हा अनुभव भारतीय सैनिकांना आलाच पण चीनी सैनिकांनाही आला. एक व्यक्ती पांधऱ्या घोड्यावरून नेहमी सीमे रेषेवर येतो याबाबतची तक्रार चीनी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे केली होती. पण असा कोणीही पांढऱ्या घोड्यावरील व्यक्ती भारतीय सैन्या मार्फत तिथे जात नव्हता हे सर्वांनाच माहित होते. ते हरभजन सिंग होते हे चीनी सैनिकांना कसे सांगणार असा ही मुद्दा पुढे आला होता.
हरभजन सिंग हे मृत्यूनंतरही ऑन ड्युटी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पगारासह दोन महिन्यांची वार्षिक सुट्टी मंजूर केली जाते. सुट्टीवर जाताना त्यांचे सामान रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवले जाते. परत येताना त्याच पद्धतीने आणले जाते. त्यांच्या नावाने नाथू ला येथे त्यांचे एक मंदिर बांधले आहे. तिथे त्यांचे बूट आणि इतर वस्तू आजही ठेवल्या जातात. त्यांच्या मंदिरात ठेवलेले त्यांचे बूट दररोज स्वच्छ केले जातात. पण ते रोज वापरल्याप्रमाणे चिखलाने माखलेले दिसतात, असे सैनिक सांगतात. त्यांचे अंथरूणही रोज विस्कटलेले आढळते, ज्यामुळे ते आजही 'ड्युटी'वर आहेत, असे मानले जाते. बाबा हरभजन सिंह हे भारताच्या सीमांचे रक्षण करणारे 'शहीद रक्षक' म्हणून ओळखले जातात, ज्यांच्या शौर्याला आणि देशप्रेमाला भारतीय लष्कर आजही सलाम करते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world