Today Shocking Crime News : हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओल्ड पोलीस स्टेशन हद्दीतील बेसलवा कॉलनीत 19 वर्षांच्या मुलानं स्वताचं आयुष्य संपवलं. काही लोकांनी AI च्या माध्यमातून त्याचे आणि त्याच्या बहिणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले. त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं. या धक्कादायक प्रकारामुळे नैराश्यात गेलेल्या मुलानं आत्महत्या केली. आरोपींनी जे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले होते, ते त्या मुलाला दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीनुसार दोन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.
AI च्या माध्यमातून अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले, नंतर जे केलं..
मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहूल डीएव्ही कॉलेजचा विद्यार्थी होता. तो त्याच्या कुटुंबियांसोबत बसेलवा कॉलनीत राहत होता. राहुलच्या वडिलांनी सांगितलं की,जवळपास दोन आठवड्यांपूर्वी कोणीतरी मुलाचा मोबाईल फोन हॅक केला होता. काही लोकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (AI) चा वापर करून राहुल आणि त्याच्या बहिणींचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ बनवले. हे खोटे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी राहुलला व्हाट्सअॅपला पाठवले आणि 20 हजारांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी दिली होती.
नक्की वाचा >> Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला,एका आयडियाने खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत
मानसिक तणावात असल्याने तरुणानं स्वत:ला संपवलं
या ब्लॅकमेलिंगमुळे राहुल खूप नैराश्यात होता. मागील 15 दिवसांपासून त्याच्या स्वभावात बदल झाला होता. तो घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हता. कुटुंबियांना जराही कल्पना नव्हती की, राहुल इतक्या मोठ्या मानसिक तणावाचा बळी पडला आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास राहुलने त्याच्या रुममध्ये विषारी गोळ्या खाल्ल्या. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेलं. पण उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला.
नक्की वाचा >> Video: 15 फुटांचा किंग कोब्रा गंगा नदीच्या किनारी आला अन् फणा काढला, आंघोळीला गेलेले लोक सैरावैरा पळाले अन्...
राहुलच्या वडिलांच्या माहितीनुसार, राहुलच्या मोबाईलमध्ये साहिल नावाच्या तरुणाने केलेली चॅटिंग होती. साहिलने राहुलचे न्यूड फोटो फोटो पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यानंतर साहिलने राहुलला धमकी दिली की, जर पैसै दिले नाहीत तर सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन. धक्कादायक म्हणजे साहिलने राहुलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचंही चॅटिंगमध्ये उघडकीस आलं आहे.