King Cobra At Ganga River Viral Video : हरिद्वारच्या चंडी घाट परिसरात नेहमीप्रमाणे आज रविवारी लोक गंगास्नान करत होते. पण काही वेळातच असं काही घडलं, ज्यामुळे लोक इकडे तिकडे पळू लागले. यामागचं कारणही तितकच भयानक आहे. सापांचा विषय जरी काढला तरी अनेकांना धडकी भरते. या ठिकाणीही सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा साप आढळला. 13 ते 15 फूट लांबीचा हा किंग कोब्रा गंगा नदीच्या किनारी फिरत होता. गंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या लोकांनी हा साप पाहिला अन् सर्वांची पळता भुई झाली. या खतरनाक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
गंगा नदी किनारी किंग कोब्रा दिसल्यावर भाविकांनी आणि स्थानिक लोकांनी गोंधळ घातला. कोणी सापाचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली, तर कोणी वन विभागाला फोन लावण्यात व्यस्त होता. बघता बघता त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली. काही लोक तर इतके घाबरले होते की,गंगा नदीतून बाहेर पडून ते दूर ठिकाणी पळून गेले. येथील काही लोक म्हणाले की, एवढा मोठा साप तर आम्ही टीव्हीवरच पाहिला आहे.
एक तास सुरु होतं रेस्क्यू ऑपरेशन
किंग कोब्राची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. टीमने खूप सावधपणे ऑपरेशन सुरु केलं. जवळपास एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर किंग कोब्रा सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. वन विभागाने सांगितलं की, हा किंग कोब्रा साप खूप दुर्मिळ प्रजातीचा साप आहे. जो सामान्यपणे जंगलात आढळतो. गंगा नदीच्या किनारी येणं हे धक्कादायक होतं.
नक्की वाचा >> IMD Alert : मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे 'इतके' दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह 'या' ठिकाणी धो धो बरसणार
इथे पाहा किंग कोब्राचा थरारक व्हिडीओ
नक्की वाचा >> Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला, खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत
लोक म्हणाले, देवाचा चमत्कार पाहिला..
रेस्क्यू केल्यानंतर जेव्हा किंग कोब्रा सापाला कपड्यांच्या झोळीत सुरक्षीतपणे बंद केलं, तेव्हा लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक भाविक म्हणाले की, हे शंकर देवाचं प्रतिक आहे आणि हा साप पाहणं शुभ असतं. दरम्यान, किंग क्रोब्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world