जाहिरात

Akola News: आधी प्रेम, मग शोषण, अश्लील फोटो ही काढले, अल्पवयीन तरुणी बरोबर भयंकर घडलं

तू दुसऱ्यां बरोबर का बोलते. माझ्या बरोबर संबंध का ठेवत नाहीत. शरीर सुख का देत नाही यामुळे तो तिचा सतत छळ करत होता.

Akola News: आधी प्रेम, मग शोषण, अश्लील फोटो ही काढले, अल्पवयीन तरुणी बरोबर भयंकर घडलं
अकोला:

योगेश शिरसाट 

लव्ह सेक्स आणि धोका असाच काहीसा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. एका अल्पवयीन तरूणीला शेजारीच राहाणाऱ्या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. विशेष म्हणजे हो दोघे ही अल्पवयीन आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर या तरुणाने मुली बरोबर शरीर संबध प्रस्थापित केले. यावेळचे फोटो आणि व्हिडीओ ही त्याने काढून ठेवले होते. त्या माध्यमातून तो त्या मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यात तिचे शोषण तो करत होता. यातूनच या तरुणाने त्या तरूणीचे अश्लील फोटो इन्स्टावर व्हायरल केले. त्यानंतर या तरुणीच्या पाया खालची वाळू सरकली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तू दुसऱ्यां बरोबर का बोलते. माझ्या बरोबर संबंध का ठेवत नाहीत. शरीर सुख का देत नाही यामुळे तो तिचा सतत छळ करत होता. शिवाय तिला मारहाण ही करत होता. एक दिवस तो तिला एका निवांत ठिकाणी घेवून गेला. तिथे त्याचे मित्र ही होते. त्यावेळी त्याने त्या अल्पवयीन तरूणीला मारहाण ही केली. त्याचा व्हिडीओ ही त्याच्या  मित्रांनी तयार केला. तो व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे. तो नेहमी तिला आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. नाही तर ते फोटो व्हायरल करेन अशी धमकी ही देत होता. 

Raj Thackeray: 'शाळा कशा हिंदी शिकवतात हेच बघू..', राज ठाकरेंचा सरकारला गर्भित इशारा

शेवटी त्याने नको ते केलेच. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती त्या तरूणीला मिळाली. तिने तातडीने ही बाबत आपल्या आईला सांगितली. आईने त्याच वेळी एका सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली. झालेला प्रकार आईने त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर घातला. त्याने तातडीने त्यांची मदत केली. पीडीत मुलीला घेवून ते अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी झालेली हकीकगत पोलिसांना सांगितली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल झाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Hindi Controversy: तिसरी भाषा शिकण्यात वाईट काय? मनसेच्या भूमिकेवरुन CM फडणवीसांचा सवाल

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडून त्या पीडितेला मारहाण  करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर पिडीतेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आई कडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान आरोपी अल्पवयीन तरूणाने आणखी एका मुलीला फसवले असल्याचंही समोर येत आहे. पण याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com