जाहिरात

Crime News : अकोला पुन्हा हादरलं, एकाच आठवड्यातील तिसरी घटना; माजी सरकारी अधिकाऱ्याची निघृणपणे हत्या

अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एकाच आठवड्यात ही तिसरी घटना आहे.

Crime News : अकोला पुन्हा हादरलं, एकाच आठवड्यातील तिसरी घटना; माजी सरकारी अधिकाऱ्याची निघृणपणे हत्या

अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या एकाच आठवड्यात ही तिसरी घटना आहे. अकोल्याच्या सेवानिवृत्त 60 वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याची हत्या करण्यात आली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेल्या दृश्यामध्ये अकोल्यातल्या रणपिसे नगरामध्ये ही थरारक हत्याकांड घडल्याचं दिसून येत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी अभियंत्याचं नाव आहे. हत्याकांडचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. दरम्यान महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी रॉडने वार करून त्यांना जागीच ठार केलं. यादरम्यान, ही घटना जुन्या वादातून झाली असल्याचे बोलले जात आहे.

Crime News: पहिल्यांदा चाकूने भोसकलं, मग जाळण्याचा प्रयत्न... माथेफिरू प्रियकराचं भयंकर कृत्य

नक्की वाचा - Crime News: पहिल्यांदा चाकूने भोसकलं, मग जाळण्याचा प्रयत्न... माथेफिरू प्रियकराचं भयंकर कृत्य

या घटनेची माहिती मिळतात शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि ठसे तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी पवार हा हत्या करून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक रवाना करण्यात आलं असल्याचं सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.

पुतण्याला दगडाने ठेचून मारलं...

काही दिवसांपूर्वी अकोल्यात काकांनी पुतण्याचा दगडाने ठेचून खून केला होता. अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी खदान पोलिसांनी त्याचा काका किशोर कमलाकरला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. कुणालचा मृतदेह ह तब्बल तीन ते चार दिवस काकाच्या घरात पडून होता.. दरम्यान कुजलेल्या स्थितीत असलेल्या कुणालच्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात सुटल्यानंतर स्थानिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर गुरुवारी (29 मे) संध्याकाळी खदान पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळ पोलिसांनी गाठून पंचनामा केला होता. त्यावेळी अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वीच कुणाल कमलाकर याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहावरून समोर आलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com