Akola News: 16 वर्षाची मुलगी रिक्षात बसताच ऑटो चालक बिथरला, भर रस्त्यात घडला धक्कादायक प्रकार

Akola News: अकोला शहरात दोन वर्षांपूर्वी अंध दापत्यांवर ऑटो रिक्षा चालकांनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अत्याचार केला होता. त्याच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola News: भर रस्त्यात घडलेल्या या घटनेनं अकोला शहरात खळबळ उडाली आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News: अकोला शहरात दोन वर्षांपूर्वी अंध दापत्यांवर ऑटो रिक्षा चालकांनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अत्याचार केला होता. त्याच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ताज्या घटनेमध्ये  16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा ऑटो चालकानं विनयभंग केला आहे. पीडित  मुलगी अमरावती जिल्ह्यातली असून अकोल्यामध्ये शिक्षणासाठी राहते. ती अकोला शहरातील बस बस स्थानकापासून रूमकडे ऑटो रिक्षाने जात असताना या ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. यावेळी मुलीने प्रतिवार करून तावडीतून सुटका केली. शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातली पीडित अल्पवयीन मुलगी अकोल्यात 'नीट' चे क्लासेस करण्यासाठी राहते. ती काल (शुक्रवार 4 जुलै) तिच्या गावाहून अकोल्याला परतली. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही मुलगी अकोला बस स्थानकात उतरली. तिने रुमवर जाण्यासाठी ऑटो केला. 

या दरम्यान ऑटो रिक्षा चालकाने ऑटो रूम कडे ऑटो न येता भलत्यात रस्त्यावर नेला, यावर विद्यार्थिनीला ऑटो रिक्षा चालकावर संशय आला. तिने जवळच्या नातेवाईकांना आम्ही फोनवर करून सर्व हकीकत सांगितली. दरम्यान यावेळी चालत्या रिक्षात चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढत तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला, असं या मुलीनं सांगितलं. पीडित मुलीने ऑटो रिक्षा चालकाच्या तावडीतून सुटका केली.  सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. 

(नक्की वाचा: Parbhani News : लग्न केलं, सत्यानारायणही झाला... एक फोन आला आणि नवरी फुर्रर्र... )

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचालकाचा तपास केला. त्यांनी जाफर खान सुभेदार खान या आरोपीला अटक केली. दिवसेंदिवस जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article