जाहिरात

Parbhani News : लग्न केलं, सत्यानारायणही झाला... एक फोन आला आणि नवरी फुर्रर्र...

Parbhani News: वेळेवर लग्न न होणे ही आपल्याकडं अनेकांची अडचण आहे. या अडचणीचा गैरफायदा घेऊन संबंधितांची फसवणूक करण्याच्या टोळ्या देखील सक्रीय आहेत.

Parbhani News : लग्न केलं, सत्यानारायणही झाला... एक फोन आला आणि नवरी फुर्रर्र...
Parbhani News : लग्नानंतर दोन दिवसांनी नववधूला फोन आला आणि...
परभणी:

दिवाकर माने, प्रतिनिधी

वेळेवर लग्न न होणे ही आपल्याकडं अनेकांची अडचण आहे. या अडचणीचा गैरफायदा घेऊन संबंधितांची फसवणूक करण्याच्या टोळ्या देखील सक्रीय आहेत. याबाबतच्या बातम्या यापूर्वीही आल्या आहेत. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या धारखेडमध्येही असाच प्रकार घडलाय. येथील एक तरुणाची लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथील फिर्यादी रामभाऊ भालके यांनी त्यांचे परिचित गवान बचाटे, शेषेराव चिंतलवार यांनी लग्नासाठी मुली पाहा असे सांगितले होते. त्यावेळी जळगावमध्ये लग्नाचे स्थळ असल्याचे सांगत भालके आणि नातेवाईकांना जळगावमध्ये नेले. 

भालके यांना जळगावमधील मनिषा पाटील यांची गायत्री ही मुलगी लग्नाची आहे, असं सांगत वधू दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मुलाने मुलगी पसंत केल्यानंतर मुलीचे आई वडिल गरीब आहेत, मुलीच्या कुटूंबाला तीला तीन लाख रूपये द्यावे तसेच सोन्याचे, चांदीचे दागिने, कपडे घेण्याची अट त्यांनी घातली. त्यानंतर रामभाऊ भालके यांनी तीन लाख रुपये, सोन्याचे मनिमंगळसुत्र, कानातील सोन्याचे झुंबर, चांदीचे चैन, जोडवे आणि वधुकडील नातेवाईकाना कपडे घेतले.

(नक्की वाचा : 2 पती, 1 प्रियकर, दीर आणि सासऱ्यासोबत संबंध, त्यानंतर सासूची हत्या... क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही महिलेची गोष्ट )

धारखेडमध्ये मोजक्या नातेवाईंकांच्या उपस्थितीमध्ये भालके यांच्या मुलाचा गायत्रीाशी 27 जून रोजी लग्न झालं.  29 जून रोजी सत्यनारायाणाची पूजा होती. त्यावेळी गायत्रीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, तिला जळगावमध्ये घेऊन या असा फोन भालके यांच्या घरी आला. 

या फोननंतर दुसऱ्याच दिवशी गायत्री तिचा नवरा आणि अन्य नातेवाईकांसह जळगावकडे खासगी वाहनानं निघाली. त्यावेळी मनमाडमध्ये गायत्रीचे नातेवाईक त्यांना भेटले. आम्हाला मनमाडच्या कोर्टात काम आहे, असं सांगत गायत्रीचा नवरा आणि सासरच्या मंडळींना मनमाडलाच थांबण्यास सांगितले. त्यानंतर माहेरची मंडळी गायत्रीला घेऊन गेले. 

काही वेळाने फिर्यादी भालके यांनी गायत्री आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींना फोन करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भालके यांनी गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री (4 जुलै 2025) तक्रार दाखल केली आहे. 

 या तक्रारीवरून भगवान बचाटे गंगाखेड, शेषेराव चिंतलवार नांदेड, (शिवाजी वाघटकर नांदेड, मनिषा पाटील, मिनाक्षी जैन, मिना बोरसे, सुजात ठाकुर, अक्षय जोशी) सर्व राहणार जळगाव, याच्यावर नववधुला घेऊन गेल्याने लग्नाचे आमिष दाखवून 3 लाख 66 हजार 960 रूपयाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण जळगावचे असल्यानं जळगाव पोलिसांकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com