Akola News: 'माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर...', 2 मुलांची आई, 2 वर्ष लैंगिक शोषण, हादरवून टाकणारी घटना

आरोपी सुरुवातीला सतत महिलेला व्हाट्सअपवर मेसेज टाकून भेटण्यासाठी बोलावत होता. तेव्हा पिडीत महिलेने आरोपीचा नंबर ब्लॉक केला.

जाहिरात
Read Time: 3 mins
अकोला:

योगेश शिरसाट,अकोला 

अकोल्याच्या बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात मध्ये एकाच आठवड्यात महिलेच्या अत्याचाराची दुसरी घटना समोर आली आहे. मूल होत नाही म्हणून उपचाराच्या नावाने अत्याचार करणाऱ्या आरोपीला बार्शीटाकळी पोलिसांनी सहा तासातच अटक केली होती. ही घटना ताजी असतानात दुसरी घटना बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली आहे.मुलाला मारून टाकेन अशी धमकी देऊन महिलेचे नग्न अवस्थेत फोटो काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याच्या धमकीने महिलेसोबत अतिप्रसंग केला. या घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यामध्ये एका गावात एका विवाहित महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बार्शीटाकळीच्या एका गावामधील महिलेचे अकोल्याच्या एकाच गावात रीती रिवाजाप्रमाणे लग्न विधी पार पडला. त्यानंतर पतीपासून एक मुलगा, एक मुलगी ही पीडित महिलेला झाली. असा सुखी संसार सुरू असताना अखेर त्यांच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडला. पीडित महिला माहेरला गेली असता गावातीलच चुलत काकाचा मेव्हणा तिथे आला. पीडित महिला ही आरोपीला पूर्वीपासूनच ओळखत होती. त्याने तू येथे कशी काय असे विचारले. तेव्हा "माझं माहेर आहे. मी दिवाळीला घरी आली असं आरोपी मिलिंद खंडारे याला सांगितले. त्यावेळेस पीडित विवाहित महिलेला मिलिंदने मोबाईल नंबर मागितला. मात्र महिलेने तो दिला नाही. मिलिंदने पीडित महिलेचा मोबाईल क्रमांक कुठून तरी मिळवला. तेव्हा पासूनच पीडित विवाहित महिलेच्या सुखी संसाराची राख रांगोळी होण्यास सुरुवात झाली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी

Advertisement

आरोपी सुरुवातीला सतत महिलेला व्हाट्सअपवर मेसेज टाकून भेटण्यासाठी बोलावत होता. तेव्हा पिडीत महिलेने आरोपीचा नंबर ब्लॉक केला. महिलेने नकार दिल्यानंतर मिलिंदने दुसऱ्या नंबरवर फोन करून बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा महिलेने तोही नंबर ब्लॉक करून ठेवला. तू माझ्याशी बोलत जाऊ नकोस असे मिलिंदला तीने सांगितलं. त्याचा राग मिलींदच्या मनात होता. पुढे घरघुती वादामुळे ही पीडित महिला माहेरी आली. त्यात दोन वर्षांपासून मिलिंद खंडारे हा पीडित महिलेला त्रास देत होता. एका दिवशी पीडित महिलेचे आई-वडील शेतात कामासाठी गेले असता, आरोपीने संधीचा फायदा घेत तिच्या घरात प्रवेश केला. तू माझे फोन का उचलत नाही असे आरोपी मिलिंद म्हणाला. तेव्हा मला तुझ्याशी बोलायचं नाही असं पिढीतेने म्हटले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagavane:वैष्णवीच्या वडीलांना अजित पवारांचा फोन, म्हणाले नालायकांना नांदवायचं नव्हतं तर...

त्यावर तो आणखी बिथरला. तो थेट म्हणाला, मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी मिलिंदने महिलेला दिली. घाबरलेल्या महिले बरोबर आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. त्याच वेळी तिचे नग्न अवस्थेतले फोटो ही काढले. त्यानंतर तेथून तो निघून गेला. झालेला सर्व प्रकार महिलेने आई-वडिलांना सांगितला. आई-वडील बदनामी होईल या भीतीपोटी आणि परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांनी बार्शीटाकळीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. याचाच फायदा आरोपीने घेतला. फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने सतत दोन वर्षापासून पीडित महिलेवर तो अत्याचार करत होता. अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील एका गावात आरोपी मिलिंद खंडारे राहातो. त्याने अनेक वेळा महिलेवर अत्याचार केला. एकेदिवशी पीडितेच्या भावाने आरोपीला विचारले "तू माझ्या घराभोवती गिरट्या का मारतोस. तेव्हा भावासोबतही आरोपीने भांडण करून महिलेच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagavane : हगवणे कुटुंबीयांना कोण वाचवतंय? रुपाली ठोंबरेंनी घेतलं IPS अधिकाऱ्याचं नाव

अखेर महिलेने या आरोपीच्या जाचाला कंटाळून आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा पतीने सुद्धा मिलिंदला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नव्हता. यादरम्यान पुन्हा 16 मे शुक्रवार रोजी परत मिलिंद हा पीडित महिलेच्या सासरी आला. पतीसह सासरीच्या मंडळीला त्रास देऊ लागला. दरम्यान या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलले. अखेर वारंवार त्रास देणाऱ्या त्या मिलिंद नावाच्या तरुणा विरोधात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात 21 मे रोजी बुधवारी तक्रार दिली. बार्शीटाकळी पोलिसांनी महिलेचे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीला अटक केली.आता आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे.