
Vaishnavi Hagavane Case : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता कारवाईला वेग आला आहे. 16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही याप्रकरणी ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे हगवणे कुटुबाच्या मागे कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत होता.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक न करण्यासाठी IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेयांनी याबबत मोठं वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
IPS जालिंदर सुपेकर हा शशांक हगवणेचा (वैष्णवीचा नवरा) सख्खा मामा आहे. त्यामुळे सुशील हगवणे (दीर) आणि राजेंद्र हगवणेला (सासरे) वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? अशी शंका रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केली.
रुपाली ठोंबरेंनी म्हटलं की, IPS जालिंदर सुपेकर यांच्या माध्यमातून त्यांना काही सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसावर कारवाई करण्यात येईल. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल, असंही ठोंबरेंनी सांगितलंय.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून दखल
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात इतर कारवाई होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन केल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन करुन आरोपींना तत्काळ अटक करुन कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूरज चव्हाण यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- हगवणे पिता-पुत्राची पक्षातून हकालपट्टी, अजित पवारांच्या पोलीस आयुक्तांना कडक कारवाईच्या सूचना)
महिला आयोगाकडून सुमोटो दाखल
राज्य महिला आयोगाने वैष्णवी हगवणे प्रकरणात सुमोटो दाखल केला आहे. आतापर्यंत माझ्याकडे या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाच्या API सोबत मी संपर्कात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 आरोपींपैकी 2 फरार आहेत. सासू, नणंद, नवरा अटकेत आहे. तर सासरा आणि दीर फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world