जाहिरात

Akola News: एकतर्फी प्रेम, 3 महिन्यापासून पाठलाग, हिंदू- मुस्लीम अँगल अन् भर रस्त्यातच त्याने तिचा...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने कहर केला.

Akola News: एकतर्फी प्रेम, 3 महिन्यापासून पाठलाग,  हिंदू- मुस्लीम अँगल अन् भर रस्त्यातच त्याने तिचा...
  • अकोल्यात २४ वर्षीय तरुणीवर तीन महिन्यांपासून आसिफ नावाचा ४५ वर्षीय व्यक्ती एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत होता
  • आरोपीने तरुणीला मोबाईलवर कॉल करून त्रास दिला व नाकारल्यानंतर कामाच्या ठिकाणी अश्लील इशारे केले होते
  • नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आरोपीने रस्त्यात तरुणीचा विनयभंग केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अकोला:

योगेश शिरसाट 

मुलींवर एकतर्फी प्रेम करणे. त्यातून  त्यांना सतत त्रास देणे हे प्रकार सर्रास पणे होत आहेत. त्यासाठी पोलीस वेळोवेळी जनजागृती करतात. काही वेळा मोहीमा ही राबवल्या जातात. काधी कधी वचक बसावा म्हणून रोड रोमीओंची धिंड ही काढली जाते. पण अशा लोकांना आळा काही बसत नाहीत. त्यामुळे एक तर्फी प्रेमाचे प्रकार ही समोर येतात. त्यातूनच नको त्या गोष्टी घडतात. अशीच एक धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीसांनी थेट कारवाई करत एकतर्फी प्रेमात वेडा झालेल्या रोमिओला चांगलेच वठणीवर आणले आहे.   

अकोला शहरात ही घटना घडली आहे. आसिफ हा 45 वर्षाचा व्यक्ती एक तरुणीचा सतत पाठलाग करत होता. ही तरुणी 24 वर्षांची आहे. ती कामावरून जाताना तो तिचा सतत पाठलाग करत होता. गेली तिन महिने हे सुरू होते. तो तिला मोबाईलवर कॉल ही करत होता. त्यानंतर तिने त्याचा फोन ब्लॉक केला होता. पण पुढे त्याने कहर केला. ती ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणी तो पोहोचला. तिथे असलेल्या दुकानाबाहेर उभा राहून तो तिला अश्लील इशारे ही करत होता. त्यामुळे या तरुणीची कुचंबना होत होती. तर ही ती हे सर्व सहन करत होती. 

नक्की वाचा - Akola News : आधी पाठलाग.. नंतर तरुणीला रस्त्यातच अडवलं; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचं संतापजनक कृत्य

 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने कहर केला. तरूणी आपल्या रस्त्याने ऑफीससाठी जात होती. त्यावेळी त्याने तिला भर रस्त्यात अडवले. तुला नवीन वर्षाचे गिफ्ट द्यायचे आहे असे तो तिला म्हणाले. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने भर रस्त्यात त्या तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर संयम सुटलेल्या पीडित तरुणीने थेट खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यात तिने  दिलेल्या जबानी तक्रारी नुसार आरोपी आसिफ याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा गेल्या तीन महिन्यापासून आपल्याला त्रास देत असल्याचं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

नक्की वाचा - Nagpur News: जन्मदात्यांनीच मुलाला साखळीने बांधलं... 3 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल; धक्कादायक कारण समोर

या दरम्यान, काल शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास, भंगार कारखाण्याजवळून मैत्रिणीसोबत जात असताना आरोपीने तिला नववर्षाची भेट देण्याचे कारण सांगून वाद घातला. शिवाय तिचा वाईट उद्देशाने हात पकडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता सनी अशोक जंजाळ यांनी हस्तक्षेप करून तरुणीची सुटका केली असं त्यांचे म्हणणे आहे. शिवाय हे प्रकरण हिंदू मुस्लीम असे असल्याचं ही त्यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. आता आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी केली असून पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी यांच्याकडून सुरू केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com