जाहिरात

Akola News: अकोल्यात 'या' ठिकाणी सुरु होता IPL चा सट्टा, 2 आरोपींनी पोलिसांना सांगितली आतली खबर

अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑनलाइन अवैध्य धंद्याचा सुळसुळाट सुरु असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणी अकोला पोलिसांकडून'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

Akola News: अकोल्यात 'या' ठिकाणी सुरु होता IPL चा सट्टा, 2 आरोपींनी पोलिसांना सांगितली आतली खबर
IPL 2026 Betting Akola Crime News

योगेश शिरसाट प्रतिनिधी 

Akola Crime News Today : अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस ऑनलाइन अवैध्य धंद्याचा सुळसुळाट सुरु असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणी अकोला पोलिसांकडून'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अकोला शहरात आयपीएलच्या अवैध क्रिकेट सट्ट्यावर रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काल 11 एप्रिल रोजी 8.30 वाजताच्या सुमारास देशमुख फैल परिसरातील एफसीआय गोदामाजवळ छापा टाकण्यात आला. सार्वजनिक मोकळ्या जागेत काही जण मोबाईलच्या माध्यमातून क्रिकेट सट्टा खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयितांवर नजर ठेवून कारवाई करण्यात आली.

दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल जप्त 

या कारवाईत पोलिसांनी शुभम कैलास थोरात (30)आणि शिवमोहन उर्फ भोला हरीमोहन यादव (36) या दोघांना रंगेहाथ पकडले.हे दोघे मोबाईल फोनवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात ऑनलाइन पैसे लावत सट्टा खेळताना आढळून आले.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन,रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 34200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> Solapur News: अशोक खरातने सोलापूरमध्ये काय काय कांड केले? सगळी कुंडली आली समोर, 'ते' प्रकरण खळबळजनकच

फरार आरोपींचा शोध सुरू

चौकशीत आरोपींनी मोहित शर्मा आणि हर्षल चाळसे या दोघांची नावे उघड केली असून ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक नेमले आहे.या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे अप.न.314/26 अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (A)अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Akola News: सूर्य आग ओकतोय! अकोल्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद , नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अप्पर पोलीस अधीक्षक बी.पी.रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली असून शहरातील अवैध सट्टा व्यवसायावर पोलिसांची नजर कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com