Akola News: अकोल्यात खळबळ! राजापेठ पोलीस निरीक्षकावर विनभंगाचा गंभीर आरोप, पत्नीला रस्त्यावर केली मारहाण 

अकोला शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यावर पत्नीला रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Akola Police Inspector Crime News (Photo AI)

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News Today :  अकोला शहरातील राजपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्यावर पत्नीला रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पुनीत यांच्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डाबकी रोडवरील साहू मंगल कार्यालयासमोर हा प्रकार घडला.पुनीत यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार,तिचे व पुनीत कुलट यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते.मात्र लग्नानंतर पैशासाठी छळ व मारहाण सुरू असल्याचा आरोप तिने केला आहे.या छळाला कंटाळून 2014 मध्ये तिने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार भादंवि कलम 498 अ अंतर्गत न्यायालयात खटला प्रलंबित असल्याचेही समोर आले आहे.

Advertisement

दरम्यान,पुनीत कुलट यांनी दुसऱ्या महिलेसोबत विवाह करून तिच्यासोबत राहत असल्याची माहिती त्यांच्या पत्नीला दिली होती.बुधवारी संबंधित महिला अकोल्यातील एका लग्न समारंभात येणार असल्याची माहिती समोर आली होती. पीडित महिला तिच्या बहिणीसह तेथे पोहोचली. यावेळी पुनीत कुलट हे एका महिलेसोबत तसेच कुटुंबीयांसह बाहेर येताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

नक्की वाचा >> Pune News मेट्रोमोनियलवर फेक प्रोफाइल, महिलेकडे केली 'ती' मागणी, अलिबागच्या आदर्श म्हात्रेनं केलं मोठं कांड

बहिण रुपालीही मदतीसाठी धावून आली अन्

याबाबत विचारणा करताच संबंधित महिला,सासू आणि वहिनीने यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर स्वतः पुनीत कुलट यांनीही पत्नीचे केस पकडून तिला रस्त्यावर ओढत मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे,तर दीराने ऑटोमध्ये ओढून अश्लील स्पर्श करत विनयभंग केल्याचेही पीडित महिलेनं तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान,बहिण रुपाली ही मदतीसाठी धावून आली असता तिच्याही अंगावर हात टाकून मारहाण व विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात 'या' परिसरात दहशतीचं वातावरण, स्थानिक नागरिकांची हवा टाईट, घराबाहेर पडताना सावधान, Video

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विशेष म्हणजे,स्वतः पोलीस निरीक्षकावरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक पुनीत कुलट यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. 

व्हिडिओ व्हायरल, धक्कादायक दृश्ये समोर

या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पुनीत कुलट व त्यांची आई (सासू) फिर्यादी दिपाली कुलट हिला रस्त्यावर ओढताना स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे.त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.

Advertisement