शाळकरी मुलांनी रिल्ससाठी चोरल्या महागड्या कार, एका चुकीमुळं फुटलं बिंग

अकोल्यातील शाळकरी मुलांनी रिल्स बनवण्यासाठी महागड्या कार चोरल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
एका चुकीमुळं या मुलांचं बिंग फुटलं
अकोला:

धनंजय साबळे, प्रतिनिधी

सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील वेगानं वाढणारं व्यसन आहे. कोणताही वयोगट त्याला अपवाद नाही. शाळकरी मुलांमध्ये तर याची मोठी क्रेझ आहे. मोबाईलवर व्हिडिओ पाहणे आणि नवीन बनवणे यामध्ये ही मुलं तासन-तास घालवतात. मुलांचं हे व्यसन कसं कमी करायचं? हा पालक, शिक्षक तसंच तज्ज्ञांसमोरचा प्रश्न आहे. मुलांचं हे व्यसन मर्यादेच्या पुढं गेलं की काय होतं? हे अकोल्यातील एका घटनेतून स्पष्ट झालंय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अकोलामध्ये पाच जणांनी सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी महागड्या कार चोरल्या. धक्कादायक बाब म्हणजे यामधील चार जण हे अल्पवयीन आहेत. या सर्वांनी पहिल्यांदा एमआयडीसी भागातल्या एका शो रुमवर डल्ला मारला. त्यानंतर स्टॉक यार्डमधून 3 लग्झरी कार चोरल्या. त्यांची किंमत 26 लाखांपेक्षा जास्त आहे.

( नक्की वाचा : वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन' )

महामार्गावर व्हिडिओ शूट करत 120 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं वाहनं चालवत असताना त्यांचं बिंग फुटलं. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणासह 4 अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. मिर्झा उबेद सईद बेग असं या प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव आहे. या सर्वांकडून तब्बल 70 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अकोला पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांन दिलीय. 

ही सर्व मुलं ही चांगल्या कुटुंबातील असून प्रतिष्ठित शाळेत शिक्षण घेतात. सोशल मीडिया आणि इन्स्टावर रिल बनवण्यासाठी त्यांनी चोरीचा मार्ग निवडला. पण, शो रुमचे जनरल मॅनेजर सागर कड यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं, असं पोलिसांनी सांगितलं. 

Advertisement
Topics mentioned in this article