जाहिरात
This Article is From May 08, 2024

वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन'

21 वर्षाच्या व्यक्तीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली असेल तर... ती  किती धोकादायक असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल.

वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन'
प्रतिकात्मक फोटो
नवी दिल्ली:

एखादी व्यक्ती 21 व्या वर्षी साधारणपणे महाविद्यालयीन शिक्षण घेत असते. शिक्षण पूर्ण झालं असेल तर नोकरी किंवा व्यवसायात जम बसून करिअरची, भावी आयुष्याची स्वप्न रंगवण्याचा हा काळ असतो. पण 21 वर्षाच्या व्यक्तीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली असेल तर... ती  किती धोकादायक असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल. हिमांशू असं या व्यक्तीचं नाव असून त्याची गुन्हेगारी जगतामध्ये भाऊ या नावानं ओळखलं जातं. भाऊ सध्या दिल्ली पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी बनलाय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्लीमध्ये कधी गोळीबार झाला तर किती गोळ्या झाडण्यात आल्या असा दिल्ली पोलिसांचा प्रश्न असतो. एक डझनपेक्षा जास्त गोळ्या चालवल्या गेल्या असतील तर दिल्ली पोलिसांचा पहिला संशय भाऊवर जातो. जितक्या जास्त गोळ्या झाडल्या गेल्या असतील तितकी त्या केसमध्ये भाऊ सहभागी असल्याची शक्यता जास्त असते.

भाऊचा गुन्हेगारी इतिहास

मुळचा हरियणामधला गँगस्टर असलेल्या भाऊनं दिल्ली-एनसीआरमधील अंडरवर्ल्डमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. डिसेंबर 2023 मध्ये भाऊच्या माणसांनी द्वारकामधील एका बिल्डरच्या कार्यालयावर 40 पेक्षा जास्त राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. त्याचवर्षी भाऊच्या टोळीनं दिल्ली आणि सोनीपत मार्गावरील गुलशन ढाबामधील दारु व्यापारी सुंदर मलिकवर 35-40 राऊंड गोळ्या झाडल्या होत्या. भाऊनं पाच पेक्षा कमी वर्षांमध्ये गुन्हेगारी विश्वात नाव कमावलंय. या कमी कालावधीत त्याच्यावरील गुन्ह्यांची यादी ही बरीच मोठी आहे.

हरियाणामधील रोहतक जवळचं रिटोली हे भाऊचं नाव. त्याच्यावर सुरुवातीाच्या काळाज एकाची हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या प्रकरणात 2020 साली त्याला अटक झाली त्यावेळी त्याचं वय 18 वर्षांपेक्षाही कमी होतं. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आला. त्यामधून तो काही महिन्यांमध्येच बाहेर आला. काही कालावधीमध्येच झज्जर आणि रोहतकमध्ये किमान 17 प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. हत्या, बळजबरीनं वसुली आणि हत्येचा प्रयत्न या प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यूचं रहस्य वाढलं, CCTV फुटेजमुळे प्रकरणाला नवं वळण

देशातून कसा पळाला भाऊ?

पोलिसांनी आपल्या भोवती जाळं विणलंय याचा सुगावा लागताच भाऊनं पलायन केलं. त्यानं बनावट कागदपत्रांचा वापर करुन पासपोर्ट तयार केला. स्वत:विरोधात लुक आऊट नोटीस जारी होण्यापूर्वीच तो देशातून पळाला. 2022 च्या शेवटी सुरुवातीला दुबई आणि नंतर पोर्तुगालमध्ये तो पळाला. 2023 मध्ये भाऊच्या सिंडिकेटवर मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हरियाणा पोलिसांनी भाऊच्या अटकेसाठी सीबीआयन आणि इंटरपोलशी संपर्क साधला. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली.

गेल्या वर्षी रोहतक आणि दिल्लीमध्ये भाऊच्या गँगशी संबंधित जवळपास 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये 79 मोबाईल फोन, 50 सिम कार्ड, विदेशी चलन, काडतूस, पासपोर्ट आणि बँकेची कागदपत्रं जप्त करण्यात आली. भाऊनं गेल्या वर्षीपासून दिल्ली-एनसीआरवर लक्ष केंद्रित केलंय. बळजबरीनं वसुली आणि गोळीबार हे प्रकार त्याच्या गँगनं केले आहेत. या गँगस्टरला पकडण्यासाठी हरियाणा पोलिसांनी 1.5 लाख तर दिल्ली पोलिसांनी 1 लाखांचं बक्षीस घोषित केलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com