Pune News :आळंदीत क्रूरतेचा कळस! 79 वर्षांच्या आजीची डोक्यात वार करून हत्या, तर 6 वर्षांच्या चिमुरडीला...

Alandi Double Murder: वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीच्या परिसरात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Alandi Double Murder: या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. (प्रतिकात्मक फोटो)
आळंदी, पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Alandi Double Murder: वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीच्या परिसरात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडीमध्ये एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच तिला सांभाळणाऱ्या एका 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण घटना घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगच्या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय 6 वर्षे) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय 79 वर्षे) या दोघीच होत्या. 

Advertisement


(नक्की वाचा : Dombivli: जामिनावर सुटला अन् थेट जत्रेत पिस्तूल काढून रिल बनवलं; डोंबिवलीच्या रिलस्टारचा पोलिसांनी उतरवला माज )

या संधीचा फायदा घेत मध्यरात्री एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. त्याने गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला आणि त्यानंतर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचाही जीव घेतला.

हा भीषण प्रकार गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर उघडकीस आला. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या आरडाओरड्यामुळे स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. 

( नक्की वाचा : Husband Wife Fight: पत्नीने चक्क मित्रासोबत शरीरसंबंधासाठी पतीवर टाकला दबाव; धक्कादायक आरोपांनी खळबळ )

या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की काही जुन्या वादातून, या दिशेने तपास सुरू आहे. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Topics mentioned in this article