जाहिरात

Husband Wife Fight: पत्नीने चक्क मित्रासोबत शरीरसंबंधासाठी पतीवर टाकला दबाव; धक्कादायक आरोपांनी खळबळ

Husband Wife Fight: पती-पत्नीमधील वादाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, पण या प्रकरणात पतीने आपल्या पत्नीवर जे आरोप केले आहेत, ते वाचून कोणाचेही डोळे विस्फारतील.

Husband Wife Fight: पत्नीने चक्क मित्रासोबत शरीरसंबंधासाठी पतीवर टाकला दबाव; धक्कादायक आरोपांनी खळबळ
Husband Wife Fight: पतीनं पत्नीवर केलेल्या धक्कादायक आरोपानं खळबळ उडाली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Husband Wife Fight: एका सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यात असा काही भयानक प्रसंग ओढवेल, याची कल्पनाही कदाचित त्याने केली नसेल. पती-पत्नीमधील वादाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, पण या प्रकरणात पतीने आपल्या पत्नीवर जे आरोप केले आहेत, ते वाचून कोणाचेही डोळे विस्फारतील. केवळ कौटुंबिक छळच नाही, तर लैंगिक अत्याचार आणि एका विचित्र मानसिक छळाचा हा प्रकार आता पोलीस दरबारी पोहोचला आहे.

संसारात सासरच्या मंडळींचा नको तितका हस्तक्षेप आणि पत्नीच्या काही अजब मागण्यांमुळे या व्यक्तीचे जगणे असह्य झाले होते. या घटनेतील पतीने केलेल्या तक्रारीनुसार, त्याला केवळ घरातून बाहेर काढले गेले नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही अत्यंत खासगी गोष्टींचा बाजार मांडण्याचा प्रयत्नही झाला.

पत्नीचा अजब हट्ट आणि छळाचा कळस

हा धक्कादायक प्रकार कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूमध्ये घडला आहे. या 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची पत्नी त्याला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती. पत्नीने त्याला अश्लील व्हिडिओ पाठवून तशाच कृती करण्यासाठी दबाव आणला. 

( नक्की वाचा : Dombivli: जामिनावर सुटला अन् थेट जत्रेत पिस्तूल काढून रिल बनवलं; डोंबिवलीच्या रिलस्टारचा पोलिसांनी उतरवला माज )

इतकेच नाही तर, आपल्या एका मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने पतीवर जबरदस्ती केल्याचा खळबळजनक आरोपही या पतीने केला आहे. पत्नीचे तिच्या माजी प्रियकरांसोबत प्रेमसंबंध असल्याचेही त्याने तक्रारीत नमूद केले आहे. या सर्व प्रकारामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असून, पत्नी त्याच्या आर्थिक स्थितीवरूनही त्याची नेहमी थट्टा उडवत असे.

घरातून हाकलले आणि दागिनेही ओरबाडले

पतीने सासरच्या मंडळींवरही गंभीर आरोप केले आहेत. सासू आणि सासऱ्यांनी मिळून त्याला धमकी दिली आणि त्याच्या घरातून त्याला बाहेर काढले. सप्टेंबर 2024 मध्ये त्याला घरातून हाकलून देण्यात आले, तेव्हा त्याला फक्त त्याचा युनिफॉर्म आणि लॅपटॉप घेऊन जाण्याची परवानगी दिली गेली. 

त्याचे पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्रे, 1.87 लाख रुपयांची रोकड आणि पत्नीला लग्नात भेट म्हणून दिलेले साधारण 108 ग्रॅम सोन्याचे दागिने सासरच्या मंडळींनी बेकायदेशीरपणे आपल्याकडेच ठेवून घेतल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच त्याच्या लॅपटॉपमधील लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील डिलीट करण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : Jalna News: कंत्राटदार 'खास' माणूस असल्यानेच नियमांना केराची टोपली? समृद्धीवरील अपघाताचे धक्कादायक सत्य उघड )

बेंगळुरूमध्ये नोंदवला गुन्हा

 बेंगळुरूमधील नगरभावी परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीने आपली पत्नी शिल्पा आणि सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. लग्नानंतर हे जोडपे जक्कुरू येथील एका आलिशान व्हिलामध्ये राहत होते. तिथेच या छळाला सुरुवात झाली.पीडित पतीने स्वत:च्या सुटकेसाठी आता पोलिसांकडे धाव घेतली असून, आपले सामान आणि दागिने परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

दुसरी बाजू आणि पोलिसांचा तपास

या प्रकरणात आता एक नवे वळण आले असून, पत्नीने देखील पतीवर प्रति-आरोप केले आहेत. यासंदर्भात तामिळनाडूमध्ये दुसरी एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही पक्षांकडून गंभीर आरोप-प्रत्यारोप होत असल्याने हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. बेंगळुरू पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सत्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com