अल्लू अर्जुन अटक प्रकरणात वेगळाच ट्विस्ट, मृत महिलेचा पती म्हणाला...

प्रीमिअर वेळी झालेल्या चेंगराचेंगरी नंतर त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
हैदराबाद:

लोकप्रिय तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचा प्रीमिअर हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुन स्वत: उपस्थित होता. त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही करण्यात आली. मात्र या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या रेवती यांच्या पतीला याबाबत काहीच कल्पना नाही. त्यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रीमिअर वेळी झालेल्या चेंगराचेंगरी नंतर त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक करण्यात आली. मात्र अल्लू ला अटक झाली आहे याची कल्पनाच या प्रकरणातील तक्रारदार असलेले भास्कर यांना नव्हती. भास्कर हे मृत रेवती यांचे पती आहेत. ते म्हणाले. की अल्लू अर्जुनला अटक झाली आहे हे मला माहित नाही. मी ही केस मागे घेण्यास तयार आहे. त्या वेळी जी चेंगराचेंगरी झाली त्यात अल्लू अर्जुनचा काही दोष नव्हता असंही ते म्हणाले. त्यांच्या मुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झालेला नाही असं ही त्यांनी स्पष्ट केल. त्यामुळे ही केस मागे घेण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - चहा पीत होता, पोलिसांनी नाश्ताही करू दिला नाही, अल्लु अर्जुनला अखेरला जामीन मंजूर

अल्लू अर्जुनचं अटक नाट्य शुक्रवारी दिवसभर चाललं. आधी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. त्यानंतर खालच्या कोर्टाने त्याचा जामीन फेटाळत त्याला 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्या आधी त्याची मेडकल टेस्टही करण्यात आली. दरम्यानच्या काळात अल्लू अर्जुन कडून तेलंगणा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. उच्च न्यायालयाने मात्र अल्लू अर्जुन याला दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. जर अल्लूला जामीन मिळाला नसता तर त्याला सोमवारपर्यंत जेलची हवा खाली लागली असती.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी आली,'या' बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार?

हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला पुष्पा चित्रपटाचा शो ठेवण्यात आला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनही तिथे उपस्थित होता. त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रीत करणं अवघड झालं होतं. त्यात चेंगराचेंगरी झाली. तिथे रेवती या महिलेचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई पोलिसांनी केली आहे. कायदा सर्वांना समान आहे. त्यात आपण हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली आहे.  

Advertisement