महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी 15 डिसेंबरला होणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. नागपुरला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर भाजपच्या संभाव्या मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर पक्षातील बड्या नेत्यांना मात्र धक्का दिल्याचे दिसून येत आहे. त्यांचा पत्ता कट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे बोलले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपच्या वाट्याला जवळपास 20 ते 22 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. त्यातील काही मंत्रिपदं रिक्त ठेवली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या विस्तारात 15 ते 16 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपने यावेळी जुन्या चेहऱ्यां बरोबरच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलेलं दिसत आहे. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील, रविंद्र चव्हाण, अतुल सावे या शिंदे सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. बाकीचे सर्व नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत.
नव्या चेहऱ्यांमध्ये संजय कुटे, आशीष शेलार, योगेश सागर, राहुल अहीर, राहुल कुल,सचिन कल्याणशेट्टी, नितेश राणे, समीर कुनवार, रवी राणा यांना संधी देण्यात येणार आहे. यातील कुटे, शेलार, सागर यांनी फडणवीस सरकारच्या काळात काही महिन्यांसाठी मंत्रिपद भूषवलं होतं. त्यांचे आता पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर नितेश राणे, राहुल कुल, राहुल अहीर, सचिन कल्याणशेट्टी आणि समीर कुनवार यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'जरा जरी लाज लज्जा शरम शिल्लक असेल तर...' ठाकरे भाजपवर का भडकले?
भाजपने आपल्या कोट्यातून महिलांनाही संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यात पंकजा मुंडे यांचे नाव निश्चित समजले जाते. तर माधुरी मिसाल यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ही पुनर्वसन होणार आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. संभाव्य मंत्र्यांमध्ये त्यांचे ही नाव आहे. त्यामुळे जने आणि नवे अशी सांगड भाजप मंत्रिमंडळात घालताना दिसत आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'अरे आपली लायकी नाही' जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करत नवनीत राणा संतापल्या
दुसरीकडे भाजपच्या जेष्ठ नेत्यांना मात्र यावेळी मंत्रिपद हुलकावणी देणार अशी चिन्ह आहे. त्यात माजी मंत्री सुधिर मुनगंटीवार, गिरीष महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. या मोठ्या नावांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यास भाजप पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवेला नाही. त्यामुळे या तिनही नावांबाबत अनिश्चितता आहे. त्यात गिरीष महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे ऐन वेळी कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे शपथविधी वेळी स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world