Fraud News: विश्वास नांगरे पाटलांचे नाव अन् डिजीटल अरेस्ट, निवृत्त शिक्षकाला 83 लाखांचा गंडा

आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins

बीड: सध्या सायबर चोऱ्यांचे धक्कादायक प्रकार समोर येत असून विविध आमिषे दाखवून, भिती दाखवून अनेकांना लुटल्याचे प्रकार घडत आहेत. केंद्र सरकारकडून अनेक उपायोजना झाल्या तरी हे प्रमाण वाढतच चालले आहे.असाच  आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाईमध्ये घडला असून एका निवृत्त शिक्षकाला  डिजिटल अरेस्ट करत 83 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी नविश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत ही फसवणूक केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रीग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करा असे म्हणत व्हॉट्सॲप कॉल वरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत झाला आहे. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत हा सगळा धक्कादायक प्रकार करण्यात आला. 

Advertisement

तुमच्या आधार कार्डवरून दुसरे सिमकार्ड घेतले असून त्याचा दुरुपयोग झाल्याचे देखील बनावट कॉल द्वारे सांगण्यात आले. आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडू यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याचे देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.

नक्की वाचा - Beed News : परळी वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात मटण, ऑम्लेट शिजवल्याचा प्रकार; भाविकांचा संताप

संजय पिसे नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून आधी या निवृत्त शिक्षिकेला मुंबई पोलिसांचे बनावट ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर भीती दाखवून 21 ते 29 मे या दरम्यान तब्बल 83 लाख 1 हजार 816 रुपये उकळले. विशेष बाब म्हणजे निवृत्त शिक्षकेने भीतीपोटी सोने प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत ही रक्कम दिल्याचे सांगितले.

दरम्यान, 30 मे रोजी गुन्हेगारांनी व्हाट्सअपवरून ब्लॉक केल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली त्यानुसार शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.