Ambernath News: बिअर पाजली नाही म्हणून तरुणाला बांबूने बदडले, दोन्ही हात फ्रॅक्चर केले, थरार सीसीटीव्हीत कैद

स्मितेश सुरेश पाटील हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. सुट्टीच्या दिवशी तो अंबरनाथ पूर्व येथील यिनसीटी रोडवरील एका बिअर शॉपजवळ बसला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अंबरनाथमध्ये दोन रिक्षाचालकांनी स्मितेश पाटील याच्यावर बिअर न दिल्यामुळे अमानुष हल्ला केला
  • हल्ल्यात स्मितेशचे दोन्ही हात तुटले. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.
  • आरोपींनी स्मितेशच्या खांद्यावर बिअरची बाटली फोडली व लाकडी बांबूने त्याला बेदम मारहाण केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
अंबरनाथ:

अमजद खान

मित्राला बिअर पाजण्यास नकार दिल्याने एका 32 वर्षीय तरुणावर दोन रिक्षाचालकांनी अमानुषपणे हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथमध्ये घडली. या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात निकामी झाले असून त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. हा सर्व प्रकार परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. फुकटची बिअर पिण्याच्या नादात दोन रिक्षाचालकांनी एका तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्वेला भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात स्मितेश पाटील नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी त्याला इतकी अमानुष मारहाण केली की त्याचे दोन्ही हात मोडले आहेत.
 
स्मितेश सुरेश पाटील हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. सुट्टीच्या दिवशी तो अंबरनाथ पूर्व येथील यिनसीटी रोडवरील एका बिअर शॉपजवळ बसला होता. यावेळी त्याचे ओळखीचे रिक्षाचालक महेश सूर्यवंशी आणि मंगेश तपासे तिथे आले. त्यांनी स्मितेशकडे बिअरची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगत स्मितेशने नकार देताच या दोघांनी रागाच्या भरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मंगेश तपासे याने बिअरची बाटली स्मितेशच्या खांद्यावर फोडली, तर महेश सूर्यवंशी याने लाकडी बांबूने स्मितेशला बेदम मारहाण केली. बचावासाठी हात पुढे केले असता, वारंवार होणाऱ्या प्रहारांमुळे त्याचे हात आणि मनगट फ्रॅक्चर झाले. त्यामुळे दोन्ही हात त्याचे फ्रॅक्चर झाले आहेत. 

नक्की वाचा - Ambarnath News: अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल

घटनेनंतर जखमी स्मितेशला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. स्मितेश बिअर शॉपजवळ असताना आरोपी महेश आणि मंगेशने त्याच्याकडे बिअरसाठी तगादा लावला. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींचा पारा चढला. मंगेशने स्मितेशचे केस धरून त्याला खाली पाडले आणि डोक्यात बाटली फोडली. त्यानंतर महेशने बांबूने त्याच्या हात-पायावर सपासप वार केले. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यामध्ये आरोपी कशा प्रकारे स्मितेशवर तुटून पडले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली नसती, तर स्मितेशचा जीव जाण्याची शक्यता होती.

Advertisement

नक्की वाचा - BIG breaking: जेएनपीटी बंदरात मोठा ब्लास्ट, केमिकल प्लांट उडाल्याची भीती, लांब-लांब पर्यंत धुराचे लोट

स्मितेशच्या डाव्या हाताला, खांद्याला आणि मनगटाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यात स्मितेशचे हात, पाठ आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्याला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या हाताला आणि खांद्याला मोठे फ्रॅक्चर आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढला जात आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.