जाहिरात

Ambarnath News: अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल

अंबरनाथमध्ये भर रस्त्यात दारूच्या नशेत दोन तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Ambarnath News:  अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल
Ambarnath Drunk People vs Police Video

Ambarnath Viral Video : अंबरनाथमध्ये भर रस्त्यात दारूच्या नशेत दोन तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणांनी पोलिसांसोबत देखील गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार,अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बी केबिन रोड येथे शुक्रवारी रात्री दोन तरुण दारू पिऊन रस्त्यावरच गोंधळ घालत होते.त्यांनी नागरिकांसोबत वाद घालत गैरवर्तन केले.ज्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.

पोलिसांनी दोन्ही तरुणांना घेतलं ताब्यात

स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र,मद्यधुंद अवस्थेतील या तरुणांनी पोलिसांशीही हुज्जत घालत धक्काबुक्की केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.अखेर दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये 3 हजार लिटर गावठी दारू जप्त, 2 आरोपींना अटक, कुठे आणि कसा रचला सापळा?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप

दरम्यान,या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या आणि पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी म्हटलंय की, संबंधित तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे.मात्र,त्यांच्या नावांची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.त्यामुळे नेमकी कोणती कारवाई झाली,याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com