जाहिरात

BIG breaking: जेएनपीटी बंदरात मोठा ब्लास्ट, केमिकल प्लांट उडाल्याची भीती, लांब-लांब पर्यंत धुराचे लोट

आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरत असून डोंगराळ भागालाही या आगीची झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

BIG breaking: जेएनपीटी बंदरात मोठा ब्लास्ट, केमिकल प्लांट उडाल्याची भीती, लांब-लांब पर्यंत धुराचे लोट
  • नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट परिसरातील केमिकल प्लांटमध्ये तीनही स्फोट झाले असून भीषण आग लागली आहे
  • आगीच्या धुराचे लोट कित्येक किलोमीटर दूरूनही दिसत असून अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहे
  • स्फोटांमुळे परिसरात मोठी घबराट आणि कामगारांमध्ये पळापळ झाली असून जखमी किंवा अडकलेल्यांची माहिती अद्याप नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी मुंबई:

ऋतिक गणकवार 

नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) क्षेत्रातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारी भीषण स्फोटासह मोठी आग लागली. एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आगीची भीषणता इतकी मोठी आहे की धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या केमिकल प्लांटमध्ये एका मागेमाग तीन स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी पोहोचलं आहे. यात किती जण अडकले आहेत किंवा जखमी झाले आहेत याची माहिती अजून ही समोर आली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजिस्टिक पार्कमधील एका केमिकल प्लांटमध्ये अचानक स्फोट झाला. यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आहे. याला लागून असलेल्या इतर दोन प्लांटमध्येही स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून भीतीपोटी कामगारांची मोठी पळापळ झाली. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे, त्याच्या मागील बाजूस डोंगराळ भाग आहे. त्यामुळे ही आग तिथेही पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय आग लागलेल्या कंपनीच्या बाजूला ही इतर केमिकल कंपनी आहे. त्यामुळे या आगीचा धोका त्यांना ही निर्माण झाला आहे. 

नक्की वाचा - Unique Wedding: अनोखी वरात! नवरी आली अन् नवरदेवाला घेऊन गेली, विदाईच्या वेळी नवरा ढसाढसा रडला, पाहा Video

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आणखी काही गाड्या त्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती आहे.  परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्याने आग अधिक पसरू नये यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही, मात्र आगीची भीषणता पाहता मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्याच्या अगदी मागे डोंगर आहे. ही आग डोंगरापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - Trending News: महिलांना आता लोकसभेत आरक्षण मिळणार की नाही? विधेयक फेटाळल्यानंतर पुढे काय होणार?

मदत कार्यात तिथे वेग आला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. केमिकल नक्की कोणते होते आणि स्फोटाचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे. आगीमुळे निर्माण झालेले काळ्या धुराचे लोट लांबूनही दिसत असल्याने नवी मुंबईकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जखमींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र या प्लांटमध्ये झालेल्या एकापाठोपाठ एक स्फोटांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरत असून डोंगराळ भागालाही या आगीची झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान चीफ फायर ऑफिसर विजय राणे यांनी ही आग नियंत्रणात आणल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की पाऊण तीन वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. आगीचे स्वरूप मोठे होते, आम्ही आग नियंत्रित केली आहे. अनेक एरिया वाचवला आहे असं ही त्यांनी सांगितलं.  केमिकल असल्यामुळे आग लागली होती. हजरडास केमिकल आहे. यात जखमी कोणीही नाही असं ही ते म्हणाले.  बऱ्यापैकी मटेरियल जळाले आहे.
आग कंट्रोलमध्ये आहे, आग कुठेही पसरणारी नाही.  कुलिंग चे काम करावे लागेल असं त्यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com