Amravati : आधी वाहनाला धडक नंतर चाकूने भोसकलं; अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा थरार

Amravati Police officer killed : अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाआहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Amravati Police officer killed : अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati Police officer killed : अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले अब्दुल कलाम अब्दुल नबी  (वय 57, राहणार : टीचर कॉलनी, अमरावती)  यांची अज्ञात आरोपींकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या नवसारी टी पॉईंट नजीक शनिवारी (ता.२८) संध्याकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घटनाक्रम समजून घेतल्याची माहिती आहे. तसेच आरोपींच्या मागावर पोलिस पथक रवाना करण्यात आली आहे.  

Advertisement

काय आहे प्रकरण?

अमरावतीच्या टीचर कॉलनीत राहणारे अब्दुल कलाम अब्दुल नबी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये ASI पदावर कार्यरत आहेत. शनिवारी घरून ते पोलीस स्टेशनला जात असतानाच अज्ञात वाहनाकडून त्यांचा पाठलाग करण्यात आला. दरम्यान  त्यांच्या वाहनाला जोरदार धडक देण्यात आली. त्यानंतर कलम यांच्यावर चाकूने वार केल्याची माहिती आहे. 

( नक्की वाचा : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले )
 

पोलीस तपासादरम्यान 15 ते 20 घाव कलाम यांच्या शरीरावर आढळून आले आहेत. सहा ते सात अज्ञात आरोपींकडून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. अब्दुल कलाम यांची हत्या कोणी केली, कशासाठी केली या संदर्भातील अधिक तपास गाडगे नगर पोलिसांनी सुरू केला आहे. अब्दुल कलाम यांच्या हत्येमागे कौटुंबिक आर्थिक व्यवहाराची पार्श्वभूमी असल्याचे समजते. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे.
 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world