Anna Sebastian Perayil : अ‍ॅनाच्या मृत्यूमागचे गूढ आता उलगडणार, केंद्रीय मंत्र्याने उचलले मोठे पाऊल

नोकरी मिळाल्याच्या अवघ्या चार महिन्यात तिच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. अ‍ॅनाच्या मृत्यूसाठी तिच्या आईने अ‍ॅना काम करत असलेल्या कंपनीला दोषी ठरवलं आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

पुण्यातील प्रसिद्ध Ernst & Young कंपनीच्या एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटन्ट (Chartered Accountant) अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिलच्या (Anna Sebastian Perayil) मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील Ernst & Young ही कंपनी जगभरातील सर्वात मोठ्या अकाऊंटिंग फर्मपैकी एक आहे. अशा कंपनीत नोकरी मिळाल्यामुळे अ‍ॅना आनंदात होती. मात्र नोकरी मिळाल्याच्या अवघ्या चार महिन्यात तिच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

(नक्की वाचा: ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ)

अ‍ॅनाच्या मृत्यूसाठी तिच्या आईने अ‍ॅना काम करत असलेल्या कंपनीला दोषी ठरवलं आहे. अ‍ॅनावर कााचा अतिप्रचंड ताण होता, कामाच्या तणावामुळे ती त्रस्त झाली होती. या तणावातून तिचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईचे म्हणणे आहे. या घटनेने खळबळ उडाली असून केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सदर प्रकाराची चौकशी केली जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी पुण्यात घडलेल्या या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांनी X वर आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की, अ‍ॅनाच्या मृत्यूबद्दल मला प्रचंड दु:ख झाले आहे. अ‍ॅनाच्या मृत्यूनंतर वरिष्ठांकडून होणाऱ्या पिळवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. या या आरोपांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून अ‍ॅनाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. 

राज्याचे उपमुख्य़मंत्री अजित पवार यांनीही X वर पोस्ट करत म्हटले आहे की "अवघ्या 26 वर्षांच्या ई अँड वायच्या तरुण कर्मचाऱ्याचा झालेला मृत्यू हा मनाला चटका लावणारा आहे. तणावामुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मला खात्री आहे की ई अँड वाय कंपनी यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलेल."

अ‍ॅनाची आई अनिता ऑगस्टीनने Ernst & Young ला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला होता. अतितणावामुळे अ‍ॅनाचा मृत्यू झाल्याचा आरोप अनिता यांनी आपल्या पत्रात केला होता. अनिता यांनी म्हटले आहे की, अ‍ॅना सेबेस्टियन पेरायिलने मार्चमध्ये Ernst & Young कंपनी जॉइन केली होती. यानंतर अवघे चार महिने म्हणजे जुलै महिन्यात तिचा मृत्यू झाला. अ‍ॅनाची आई अनिताने Ernst & Young चे चेअरमन राजीव मेमानी यांना पत्र लिहिले होते.अनिता यांनी या पत्रात म्हटले आहे की, अ‍ॅनाच्या मृत्यूनंतर तिच्या कंपनीतील कोणीही तिच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले नव्हते. अ‍ॅनाने 2023 साली सीएची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मार्च 2024 मध्ये ती EY पुणे मध्ये कामाला लागली होती. अ‍ॅनाची ही पहिलीच नोकरी होती. नव्या नोकरीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती अथक प्रयत्न करत होती. मात्र तिच्यावर कामाचं इतकं ओझं टाकण्यात येऊ लागलं की ते तिला असह्य होत होतं. अ‍ॅना निमूटपणे आपलं काम करत होती, मात्र कामाचा व्याप वाढतच चालला होता. अपुरी झोप, वेळेवर जेवण नाही अशा स्थितीतही अ‍ॅना काम करत होती. या सगळ्याचा परिणाम अॅनाच्या प्रकृतीवर होत होता.

Topics mentioned in this article