Ashok Kharat: 'हा' चित्रपट पाहून अशोक खरात बनला 'मास्टरमाईंड', चीड आणणारं भोंदूबाबाचं आणखी एक प्रकरण समोर

महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात जेलची हवा खात आहे. खरातच्या कारनाम्यांचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत.अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ashok Kharat Case Latest Update

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Ashok Kharat Case New Update : महिलांचं लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात जेलची हवा खात आहे. खरातच्या कारनाम्यांचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत.अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरातने थेट ‘स्पेशल 26' चित्रपटाचा फंडाच वापरल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 132 बनावट खात्यांच्या तपासात एक नवा धक्कादायक पैलू उघडकीस आलाय. खरात त्याच्या भक्तांनाच बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनवून त्याच्या इतर भक्तांकडे पाठवायचा आणि आर्थिक तडजोड करायचा, अशी माहिती समोर आली आहे.  छाप्याचा बनाव,भीतीचं वातावरण आणि मग सुरू व्हायचा लाखो-कोट्यवधींच्या डीलचा खेळ.विशेष म्हणजे अधिकारीही त्याचेच आणि ‘भक्त'ही त्याचेच.त्यामुळे संपूर्ण सेटअप आधीपासूनच फिक्स केला जायचा, अशी माहिती आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: एकाने डोळे झाकले, दुसऱ्याने व्हिडीओ काढला, अन् तिसरा..मोठागाव-माणकोली पुलावर भयानक प्रकार

आर्थिक फसवणुकीचं जाळं किती मोठं?

खरातकडे तडजोड करून प्रकरण दाबण्यासाठी प्रचंड मोठी रक्कम घेतली जायची. या सगळ्या प्रकारामुळे आर्थिक फसवणुकीचं जाळं किती मोठं आहे,याची कल्पनाही कोणी कली नसेल. या बनावट ‘रेड'ऑपरेशनमध्ये आणखी कोण-कोण सामील आहे? आणि या संपूर्ण रॅकेटमागे मोठी साखळी तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील या महामार्गावर गांजा तस्करांचा धुमाकूळ, पोलिसांना पांढऱ्या कारमध्ये सापडला 25 किलो गांजा