आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी मंगळवारी आपल्या पत्नीच्या निधनानंतर स्वत:चा जीव संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होती. दोन महिन्यांपूर्वी तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया यांनी आयसीयूमध्ये आपल्या सरकारी पिस्तुलाने पत्नीच्या मृतदेहासमोर स्वत:वर गोळी झाडली. आसाम पोलीस महानिर्देशक जीपी सिंह यांनी चेतिया यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याच्या काही मिनिटात चेतिया यांनी स्वत:वर गोळी झाडली. चेतिया यांच्या निधनानंतर आसाम पोलिसांना जबर धक्का बसला आहे.
नक्की वाचा - जिम ट्रेनरबरोबर प्रेम, पतीची हत्या, एक वॉट्सअप मेसेज अन् 3 वर्षापूर्वीच्या खूनाचा उलगडा
कोण होते शिलादित्य चेतिया?
आसाम ट्रिब्युननुसार, 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शिलादित्य चेतिया गेल्या चार महिन्यांपासून सुट्टीवर होते. पत्नीच्या आजारपणामुळे ते टेन्शनमध्ये होते. त्यांच्या पत्नीची प्रकृती अधिक खालावली होती. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दुपारी साडे चार वाजताच्या आसपास चेतिया यांच्या पत्नीचं निधन झालं. त्या 40 वर्षांच्या होत्या. पत्नीच्या मृत्यूनंतर दहा मिनिटात चेतिया ICU मध्ये आले. पत्नीसोबत काही वेळ घालवायचं सांगून त्यांनी सर्व मेडिकल स्टाफला बाहेर जायला सांगितलं. जसा स्टाफ बाहेर निघाला तसं चेतियांनी सरकारी पिस्तुलाने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.
शैलादित्य चेतिया ह्यांना राष्ट्रपतीचं पोलीस पदकही मिळालेलं होतं. शैलादित्य चेतिया धाडसी अधिकारी म्हणून ओळखले जायचे. काही दिवसांपूर्वी चेतिया यांच्या आईचंही निधन झालं होतं. त्यानंतर काही दिवसातच सासूंचेही निधन झाले. आसाम सरकारमध्ये सचिव पदावर येण्यापूर्वी चेतिया राज्याचे तिनसुकिया आणि सोनितपूर जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून काम करीत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world