जाहिरात

Anjana Krishna: थेट अजित पवारांशी पंगा! कोण आहेत महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा, काय आहे पार्श्वभूमी?

याशिवाय शेतकरी संघटनेचे नेतेही अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही अजित पवारांच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

Anjana Krishna: थेट अजित पवारांशी पंगा! कोण आहेत महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा, काय आहे पार्श्वभूमी?
मुंबई:

अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल नाव आहे. त्यांची 40 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे. सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा धाक आहे. अजित पवारांना न ओळखणारा एकही माणूस महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही. अशा अजित पवारांना एक महिला आयपीएस अधिकारी थेट नडल्या आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव आहे आयपीएस अंजना कृष्णा. सध्या त्या चर्चेत आहेत. ते थेट अजित पवार यांना नडल्यामुळे.

त्याचं झालं असं की माढ्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार आली. यानंतर डीएसपी अंजना कृष्णा टीमसोबत घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी मुरुमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले. अधिकाऱ्यांना दमदाटी केली. पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत. त्या कारवाईवर ठाम राहिल्या. आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप याने तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. 

नक्की वाचा - Ahilyanagar News: कट्टर विरोधात आमदार सत्यजीत तांबे-अमोल खताळ एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

त्याने डीएसपी अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला. यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा उलट सवाल केला. मग काय अजित पवारांच्या रागाचा पारा चढला. इतकी डेअरींग आहे का तुमची. कारवाई थांबवा असं अजित पवार म्हणाले. पण अंजना काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. आता अंजना कृष्णा ऐकत नाही म्हटल्यावर, अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं. तेव्हा कुठे कारवाई थांबली. 

या प्रकरणानंतर आयपीएस अंजना कृष्णा फार चर्चेत आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांच्या वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता. आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायच्या. 2023 मध्ये त्या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची पहिलीच पोस्टींग केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाली. 2024 मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये त्यांची बदली झाली.  अंजना कृष्णा सामाजिक कार्यतही सक्रीय आहेत. यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात. म्हणजे अगदी करियरच्या सुरुवातीलाच अंजली कृष्णा यांनी बडा पंगा घेतलाय तोही अजित पवारांबरोबर. त्यामुळे त्यांच्या डेअरिंगचंही कौतूक होत आहे.  

 GST Rate Cut: सर्वसामन्यांना मोठा दिलासा! जीएसटी कर बदलांमुळे 'या' वस्तू होणार स्वस्त, वाचा यादी

थेट अजित पवारांनाच भिडल्यामुळे त्या चर्चेचा विषय झाल्या आहेत. पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथेच संपला नाही. अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. करमाळ्यात ऑफिसर आपले काम करत होत्या. तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? माहिती तरी घेतली का अजित पवारांनी? तुझे डेरिंग कसे झाले.. असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी ? ह्या बद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. याशिवाय शेतकरी संघटनेचे नेतेही अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ही अजित पवारांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. महिला अधिकाऱ्याला झापलं असं बोलणं चुकीचं असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितले. एखादं काम आवडलं नाही किंवा कामात दिरंगाई केली तर अजित पवार थेट अधिकाऱ्यांना झापतात. पण या महिला अधिकाऱ्याला झापणं अजित पवारांनाच जड गेल्याचं दिसतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com