Crime Story: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला तहसीलदारावरच हल्ला, प्रकरण काय?

प्रतिभा गोरे या जालन्यातील परतूरच्या तहसीलदार आहेत. त्यांनी तालुक्यात होणाऱ्या अवैध वाळू उपशाला चांगलाच चाप लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

एकीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची तयारी केली जात आहे. महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. महिला या पुरूषांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत. उलट त्या काकणभर सरसचं ठरतात. असं असताना ही त्या सुरक्षित आहेत का? हा खरा प्रश्न आहे. सर्व सामान्य मुलीं पासून ते अगदी मंत्र्याची मुलीपर्यंत सर्वच असुरक्षित असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे. त्याता आता एका महिला अधिकाऱ्यावरच थेट हल्ला करण्याची मजल गेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रतिभा गोरे या जालन्यातील परतूरच्या तहसीलदार आहेत. त्यांनी तालुक्यात होणाऱ्या अवैध वाळू उपशाला चांगलाच चाप लावला आहे. असं असलं तरी वाळू माफीया मात्र आपल्या ताकदीच्या जोरावर तहसीलदारांचे आदेश मानण्यास तयार नाहीत. तालुक्यातल्या दुधना नदीत मोठ्या प्रमाणात अवैध पणे वाळू काढली जाते. याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली होती. त्यांच्यावर कारवाई करायची यासाठी त्यांनी आपला मोर्चा थेट दुधना नदीच्या दिशेने वळवला.

ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad: वाल्मीक कराडकडून चक्क 15 लाखाची खंडणी वसूल केली, वसूल करणारा कोण? प्रकरण काय?

त्यावेळी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता. त्या ठिकाणी  अखिल बिल्डर, इलियास कुरेशी, अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद व इतर दोघे वाळू उपसा करत होते. अचनाक तहसीलदार मॅडम आल्याने हे सर्वजण आक्रमक झाले. ते त्यांच्या अंगावर धावून गेले. त्या अधिकारी एक महिला आहेत, याचाही त्यांनी विचार केला नाही. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात महिला तहसीलदार यांना लाथ मारताना स्पष्ट दिसत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले

याप्रकरणी आता परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील तिथं उपस्थित असलेल्या आणि  हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील काही आरोपी हे फरार आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची तयारी होत आहे. त्याच्या एक दिवस आधीच एका महिला अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने हल्ला होत आहे, याचा अर्थ काय? अशीच विचारणा होत आहे. एक महिला अधिकारीही सुरक्षित नाही यातून स्पष्ट होत आहे.  

Advertisement