जाहिरात

Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले

प्रविण दरेकर यांनी म्हटलं की, "संभाजी महाराजांची तुलना करुन घ्यायला अनिल परब कोण लागून गेले. अनिल परब यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.

Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले

Vidhan Parishad Updates : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना केल्याच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत सत्ताधारी आक्रमक झाले. मंत्री नितेश राणे आणि आमदार प्रविण दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला होता. तर माझा छळ पक्ष बदलण्यासाठी केला, असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरुन अनिल परब यांना सत्ताधाऱ्यांना विधानपरिषदेत घेरलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, "यांचा छळ झाला त्याची व्याख्या काय आहे. लोकांची घरे तोडण्यासाठी हे तक्रारी करतात. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यासाठी फोन करतात. यांची सत्ता असताना हे लोकांचा छळ करायचे आणि हे म्हणतात आमचा छळ झाला. हे छळ करणारे आहेत." कंगना रणौत आणि नारायण राणे यांचा संदर्भ देत नितेश राणे अनिल परब यांना लक्ष्य केलं. 

अनिल परब कोण लागून गेले- प्रविण दरेकर

प्रविण दरेकर यांनी म्हटलं की, "संभाजी महाराजांची तुलना करुन घ्यायला अनिल परब कोण लागून गेले. अनिल परब यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज आमचं प्रेरणास्त्रोत आहेत, आमचे आदर्श आहे. राज्यपालांच्या अभिाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे अनिल परब यांनी माफी मागावी अशी आमची विनंती आहे." 

(नक्की वाचा- Budget Session 2025: फक्त घोषणा, धनंजय मुंडेंनी खरंच राजीनामा दिला का? सभागृहात राडा)

नाक घासून माफी मागा- शंभुराज देसाई

शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, "अनिल परब स्वत:ची तुलना संभाजी महाराजांशी करत असतील तर ते चुकीचे आहे. महाराष्ट्रातली आणि देशातील जनता हे सहन करणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. बोललेले शब्द मागितले घेतले पाहिजे. संभाजी महाराजांची नाक घासून माफी मागितले पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे."

अनिल परब यांचं प्रत्युत्तर

सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधल्यानंतर अनिल परब यांनी म्हटलं की, "माझं भाषण तपासून घ्या. संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवायला मला कधीही लाज वाटणार नाही. ते माझ्यासाठी देव आहेत. मी त्यांचा अपमान केला आहे असे वाटत असेल तर तुम्ही कामकाजातून काढून टाका. कुणी उठतंय आणि बोलतंय, मग आम्हालाही त्यांच्याबद्दल बोलावे लागेल. सभागृहाच्या मर्यादा दोन्ही बाजूने सांभाळली गेले पाहिजे. माझ्या तोंडून एखादा शब्द निघाला असेल तर तो कामकाजातून काढून टाकण्याचा आणि समज देण्याचा अधिकार सभापतींना आहे, यांना नाही, हे कोण आहेत?"

(नक्की वाचा-  Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)

"संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी असे मी म्हणालो, यात चुकीचे काय? चुकीचे असेल तर आपला अधिकार आहे. या सदनातील एका सदस्याने आपल्या कुत्र्याचे नाव शंभू ठेवलंय, घ्या त्याची माफी पहिले. त्याची माफी मागणार का? कोरटरकर , सोलापूरकरांचा विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे", असंही अनिल परब यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: