
वाल्मीक कराड हा खंडणी वसूल करत होता, हे समोर आलं आहे. त्या विरोधात तसा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणातूनच मस्साजोगेच संरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यातही वाल्मीक कराड हा मुख्य सुत्रधार असल्याचं आरोपपत्रात म्हटले आहे. पण याच वाल्मीक कराडकडून एकाने चक्क 15 लाखाची खंडणी वसूल केली आहे. तशी तक्रार 3 जानेवारी 2024 रोजी दाखल करण्यात आली आहे. असं काही होवू शकतं यावर विश्वास बसत नाही असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे वाल्मीक कडून 15 लाख वसूल करणारा हा कोण? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाल्मीक कराडला शिवराज बांगर ही व्यक्ती वारंवार धमक्या देत होती असं तक्रारीत म्हटलं आहे. बांगर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. बांगर वारंवार वाल्मीक कराडला फोन आणि वॉट्सअपकॉल करून त्रास देत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. मला 15 लाख द्या नाही तर मी तुला ठार मारेन. गाडी अंगावर घालेन अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या असंही या तक्रारीत आहे.
धमक्या दिल्या नंतर बांगर हा परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात आला होता. त्याने आपल्याला वाल्मीक कराडने पाठवले असल्याचे सांगितले. शिवाय आपल्याला 15 लाख द्यायला सांगितले आहे असंही त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या गणेश उगले याला सांगितले. उगले हा कार्यालयात टायपिंगचे काम करतो. त्यानंतर उगले यांने वाल्मीकला फोन केला. बांगर 15 लाख मागत असल्याचं सांगितलं. त्यावर तो आपल्याला धमकी देत आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल. त्यामुळे त्याला 15 लाख दे असं वाल्मीकने सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
त्यानुसार उगेल यांनी कार्यालयाच्या लॉकरमध्ये असलेले 15 रुपये शिवराज बांगर याला दिले. त्यानंतर बांगर हा तिथून निघून गेला. बांगरने 15 लाख घेतल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचा दावाही उगले याने आपल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर काही दिवस बांगर याचे कोणतेही धमकीचे फोन आले नाहीत. मात्र काही दिवसानंतर परत त्याने वाल्मीकला धमकी दिली. त्यानंतर आपण या विरोधात तक्रार केली पाहीजे असे वाल्मीक आणि उगले यांचे ठरले. त्यानंतर रितसर तक्रार देण्यात आली ही तक्रार परळी पोलीस ठाण्यात देण्यात आली. 3 जानेवारी 2024 ला त्याची नोंद करण्यात आली आहे. त्याची एफआयआर आता समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कराडकडून कुणी खंडणी वसूल करू शकतो यावर आपला विश्वास बसत नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world