Atul Subhash Death: इंजिनिअर अतुल सुभाष यांनी केलेल्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आता न्याय मिळावा यासाठी याचना केली आहे. अतुल यांचा भाऊ विकास यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहीजे अशी मागणी केली आहे. शिवाय या देशात असाही कायदा असला पाहीजे ज्या माध्यमातून पुरूषांनाही न्याय मिळेल. शिवाय अशा व्यक्ती विरोधातही कारवाई झाली पाहीजे जे भ्रष्टाचार करून न्याय देण्याचं काम करतात असंही ते म्हणाले. त्यांचा इशारा हा अतुल यांच्या केसची सुनावणी करणाऱ्या जज यांच्याकडे होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जज ही अतुलवर हसल्या होत्या
अतुल याच्याकडे पैशांची सतत मागणी केली जात होती. आधी त्याच्याकडे 40 हजार प्रत्येक महिन्याला मागितले गेले. मात्र त्यानंतर ही रक्कम दुप्पट करण्यात आली. पुढे त्याला एक लाख रूपये देण्यास सांगण्यात आले. असे अतुलचे काका पवन कुमार यांनी सांगितले. मुलाचे संगोपनाच्या नावाखाली ते अतुलकडून वसूली करत होते असा आरोपही त्यांनी केला आहे. लहान वयात मुलाला सांभाळण्यासाठी किती पैसे लागता असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. येवढेच नाही तर जर अतुल ऐवढी रक्कम देवू शकत नसेल तर त्याने आत्महत्या केली पाहीजे असं त्याची पत्नी म्हणाली होती असंही पवन यांनी सांगितलं. तिच्या या वक्तव्यावर कोर्टातल्या जजही हसल्या होत्या असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे अतुल खूप खचून गेला होता. त्या वेळपासूनच त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळत होता, पण याची त्याने कोणालाही भनकही लागू दिली नाही.
निकीताचे कुटुंबीय झाले फरार
अतुलची पत्नी निकीता ही सध्या दिल्लीत आहे. तिच्या आईचे म्हणणे आहे जे काही होईल ते आता कोर्टात होईल. निकिताचे मोठे काकाही अतुलच्या आत्महत्येमुळे शॉकमध्ये आहेत. त्यांच्या विरोधातही बंगळूरूमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान निकीताच्या घरी एडीटीव्हीची टीम गेली होती. त्यावेळी निकीताची आई निशा सिंहानिया आणि तिचा भाऊ अनुराग सिंहानिया हे एनडीटीव्हीच्या टीमवर भडकले. दरम्यान अतुलच्या प्रत्येक आरोपाचे उत्तर निकीता जवळ असल्यचे तिचे नातेवाईक दावा करत आहेत. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निकिताचे कुटुंबिय जौनपूरच्या घराला टाळं लावून फरार झाले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी उत्तर देऊन टाकले, फडणवीसांचे मात्र मौन
भावाने दिला थेट इशारा
ज्यावेळी माध्यम प्रतिनिधी निकीताच्या घरी पोहोचले त्यावेळी तिची आई आणि भावाने बोलण्यास नकार दिला. शिवाय माध्यम प्रतिनिधींना त्यांचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले. आम्हाला जे काही बोलायचे आहे ते सर्वांच्या समोर बोलू. शिवाय आमच्या वकिलांना ही सर्व काही सांगू. आमच्यावर जे काही आरोप लावले गेले आहेत त्या प्रत्येकाचे उत्तर दिले जाईल. त्यामुळे तुम्हाला जे काही माहित करून घ्यायचे आहे ते कोर्टात जावून माहित करून घ्या असं सांगित त्यांने माध्यम प्रतिनिधींनाच फटकारले.
ट्रेंडिंग बातमी - Naxalites Encounter: दंतेवाडा-नारायणपूरच्या सीमेवर चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
निकीताचेही गंभीर आरोप
निकीतानेही अतुल विरोधात गंभीर आरोप केले आहे. याबाबतची सुनावणी स्थानिक कोर्टात सुरू आहे. अतुल आणि त्याचे कुटुंबीय आपला हुंड्यासाठी छळ करत होते असा तिचा आरोप आहे. शिवाय नोकरी करत असताना होणारा पगारही अतुल त्याच्या खात्यात वर्ग करण्यास जबरदस्ती करत होता. त्याच बरोबर तो आणि त्याचे कुटुंबिय आपल्याला मारहाण करत होते. या सर्व गोष्टींना कंटाळून आपण अतुल पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अतुल आणि निकीता यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. त्यांना एक मुलगा ही आहे.