जाहिरात

Naxalites Encounter: दंतेवाडा-नारायणपूरच्या सीमेवर चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

गेल्या वर्षभरात जवळपास 220 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर गेल्या पाच वर्षात 219 जणांना यम सदमी पाठवण्यात आलं आहे.

Naxalites Encounter: दंतेवाडा-नारायणपूरच्या सीमेवर चकमक, 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
नागपूर:

छत्तीगडच्या नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये जोरदार चकमक झाली आहे. या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत. या नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. ही चकमक नारायणपूर आणि दंतेवाडाच्या अबूझमाड जंगलात पहाटे तीन वाजता झाली. यात अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अबूझमाडच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपले असल्याची माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती. यानंतर दहा तारखेला चार जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या जवानाना या ठिकाणी पाठवण्यात आलं. गेल्या दोन दिवसापासून सुरक्षा दलाचे जवान जंगलात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर गुरूवारी पहाटे जवानांची तुकडी नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर पोहोचली. त्यानंतर जवान आणि नक्षली यांच्यात चकमक उडाली. जवळपास सहा ते सात तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यात सात नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - पोलीस बंदोबस्तात रेव्ह पार्टी? बारबाला नाचवल्या, गाड्या फोडल्या, रात्रभर काय काय झालं?

या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर अनेक नक्षली पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. अजूनही सुरक्ष दलाचे जवान जंगलात उपस्थित आहेत. या भागात आता सर्च ऑपरेशन केलं जात आहे. या चकमकीत मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याती शक्यता आहे. ज्या नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे त्यांची ओळख अजून झालेली नाही. पोलिस मुख्यालयात पोहोचल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. दंतेवाडाचे एसपी गोरव राय यांनी चकमक झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मंत्रिमंडळ विस्तार कधी? अजित पवारांनी उत्तर देऊन टाकले, फडणवीसांचे मात्र मौन

दरम्यान गेल्या वर्षभरात जवळपास 220 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर गेल्या पाच वर्षात 219 जणांना यम सदमी पाठवण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांना संपवण्यासाठी हायटेक यंत्रणेचा वापर केला जात आहे. ड्रोनच्या सहाय्याने नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यातून त्यांचा पत्ता सापडत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना टिपण्यात यश येत आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहन करण्यात येत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com