
Swami Chaitanyananda Dirty Messages Viral News : विद्यार्थीनींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या बाबा चैतन्यानंद प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बाबा चैतन्यानंदने मुलींना अश्लील मेसेज केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. आरोपी बाबा विद्यार्थीनींना आय लव्ह यू (I love You) असे मेसेजही करायचा. या बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, श्रीसीम भारती इन्स्टिट्यूटचे कुलपती स्वामी चैतन्यानंदने त्यांची एका फॉर्मवर जबरदस्ती सही घेतली होती.
एक्स-रे रिपोर्टच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी चॅटिंग केली अन्..
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये ए़डमिशन झाल्यानंतर स्वामीसोबत पहिलं बोलणं झालं होतं. जिथे त्यांना चुकीच्या पद्धतीने डिमोटिव्हेट करण्यात आलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये हॉस्टेलच्या जिन्यावरून पडल्यानंतर विद्यार्थीनी फ्रॅक्चर झाली होती. एक्स-रे रिपोर्ट पाठवण्याच्या बहाण्याने स्वामीने विद्यार्थीनीला मोबाईलवर संपर्क साधला.
'I Love You' मेसेज पाठवले अन्..
स्वामीने विद्यार्थीनीला चुकीचे मेसेज पाठवणे सुरु केलंय. यामध्ये आय लव्ह यू, तू मला खूप आवडते, तू खूप सुंदर दिसते, अशा मेसेजचाही समावेश होता. मेसेजचा रिप्लाय न दिल्याने स्वामीने विद्यार्थीनीला नोटिस पाठवून कमी मार्क्स देण्याची धमकी दिली.
छेडछाड प्रकरणात बाबाची लेडी गँगही सामील
आश्रममध्ये विद्यार्थीनींसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणात बाबाला लेडी गँगनेही मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूटची स्टाफ श्वेता,भावना आणि काजल नावाच्या महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थीनींना जबरदस्ती चॅट डिलिट करायला लावली. विद्यार्थ्यांना माफीनामाही मेलवर पाठवायला सांगितला.
होळीला मुलींना रांगेत उभे करून रंग लावायला सांगायचा
होळी उत्सवात सर्व मुलींना रांगेत उभं करून स्वामीला रंग लावण्याचा आदेश दिला जायचा.होळीनंतर स्वामीने विद्यार्थीनीला ऑफिसमध्ये बोलावून जबरदस्ती व्हिडीओ रेकॉर्डिंग केली आणि त्यांच्यासोबत चुकीचं बोलणं केलं.तसच जून 2025 मध्ये ऋषीकेश ट्रीप दरम्यानही बाबा विद्यार्थीनींना फावळ्या वेळात बोलवायचा आणि त्यांची छेड काढायचा. ज्या विद्यार्थीनीने बाबाला विरोध केला, तिला परीक्षेला न बसू देण्याची धमकीही देण्यात आली.
बाबावर आरोप करण्यात आला आहे की, विद्यार्थीनींनी पालकांना कॉल करू नये, यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले पालकांचे नंबर्सही ब्लॉक करण्यात आले होते. तसच बाबाने एका विद्यार्थीनीला धमकी दिली होती की,हल्द्वानी येथील एसपींकडून तिच्या भावावर कारवाई करण्यात येईल, असाही आरोप करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world