Baba Siddique बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी कितीची सुपारी? प्रत्येकाला मिळणार होते...

या आरोपींनी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी सुपारी घेतली होती. ती सुपारी कितीची होती? आरोपीच्या वाटेला किती पैसे मिळणार होते? याची माहितीही आता समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Shot Dead) यांची मुंबईतल्या वांद्रे इथे हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. या आरोपींनी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी सुपारी घेतली होती. ती सुपारी कितीची होती? आरोपीच्या वाटेला किती पैसे मिळणार होते? याची माहितीही आता समोर आली आहे. शिवाय हत्ये आधी या आरोपींनी काय काय केले? त्यांना हत्यारं कधी आणि कोणी दिली हे आता चौकशीत समोर आले आहे. तिसरा आरोपी हत्या केल्यानंतर फरार आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी चार जणांना सुपारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे हे आरोपी पंजाबच्या एका जेलमध्ये होते. तिथेच त्याचा संपर्क बिष्णोई गँग बरोबर आला. तिथेच सिद्दीकींच्या हत्येचा कट रचण्यात आला. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं. त्यानुसार 2 सप्टेबरला हे आरोपी मुंबईत आले. त्यांनी कुर्ल्यात एक रूम भाड्याने घेतली. त्याचे भाडे 14,000 रूपये ठरले होते. इथं राहात असताना हे आरोपी बाबा सिद्दीकींवर नजर ठेवून होते. त्यांनी रेकी ही केली होती. सिद्दीकी कधी आणि कुठे कुठे जातात. यावर त्यांची नजर होती. 

ट्रेंडिंग बातमी - Baba Siddiqui News : 48 वर्षे काँग्रेसमध्ये, 8 महिन्यांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश; कोण होते बाबा सिद्दीकी?

या हत्येसाठी 2 लाखांची सुपारी देण्यात आली होती. या हत्येत असलेल्या प्रत्येकाला त्यातून 50,000 हजार रूपये मिळणार होते. त्यासाठी त्यांनी ही हत्या केली. आरोपी हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आहेत. एक महीन ते मुंबईत राहीले. तिथे राहून त्यांनी प्रत्येक माहिती बाबा सिद्दीकींची मिळवली होती. हत्या करण्याच्या एक दिवस आधी त्यांना हत्यार पुरवण्यात आली होती. शिवाय हत्येसाठी दिली जाणारी रक्कम त्यांना आधीच देण्यात आली होती. ते पैसे त्यांनी वाटून घेतले होते हे तपासात आता पुढे येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासात काय-काय आलं समोर? 10 ठळक मुद्दे

या हत्येतील सर्व आरोपी हे क्रिमिनल पार्श्वभूमी असलेले आहेत. हत्येच्या दिवशी ते बाईकवरून सिद्दीकी यांच्या कार्यलया बाहेर गेले होते. त्याच वेळी सिद्दीकी हे कार्यालयातून आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. गाडीत बसल्यानंतर या हल्लोखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना लिलावती रूग्णालयात नेण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला होता. गोळ्या झाडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी दोन आरोपींना पकडले. त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध आता पोलिस करत आहेत.