'काठीवाला दादा' बदलापूर प्रकरणात ओळख परेडमध्ये काय झालं?

आता एसआयटीकडून चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अक्षय शिंदे याने याच दोन चिमुरड्यांवर अत्याचार केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बदलापुरातील अत्याचार प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे.  आरोपी नराधम अक्षय शिंदे याची ओळख परेड शनिवारी कल्याण कोर्टात पार पडली. यावेळी पीडित चिमुकल्या मुलींनी नराधम अक्षय शिंदे याला ओळखलं आहे. त्यामुळे आता एसआयटीकडून चार्जशीट दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अक्षय शिंदे याने याच दोन चिमुरड्यांवर अत्याचार केला होता. त्यानंतर बदलापूरसह संपुर्ण महाराष्ट्रात जनतेचा राग बाहेर आला होता. बदलापूर स्थानकात तर लोकांच्या रागाचा उद्रेकही झाला होता.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शुक्रवारी न्यायालयाने नराधम अक्षय शिंदे यांची ओळख परेड करण्याची परवानगी एसआयटीला दिली होती. त्यानुसार शनिवारी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण कोर्टात आणण्यात आलं. यानंतर पाच पंचांसमक्ष त्याची ओळख परेड करण्यात आली. हे पंच आणि पीडित मुली एकमेकांना ओळखत नव्हते. या पंचांसमोर 'काठी वाला दादा' म्हणत दोन्ही पीडित मुलींनी अक्षय शिंदे याला ओळखलं. यामुळे अक्षय शिंदे याच्या गळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे. आता एसआयटीकडून या प्रकरणात लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असून या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेतली जाणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - मालेगावात गाऊन गँगचा धुमाकूळ ! चोरीसाठी नवा फंडा, नागरिकांमध्ये भीती

बदलापूरमध्ये झालेल्या या प्रकरणामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. आरोपी नराधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती. सरकारवर दबाव वाढत होता. त्यामुळे सरकारनेही या प्रकरणात तातडीने पावलं उचलली. आता ओळख परेडही झाली आहे. त्यात नराधमाला पीडित मुलींनी ओळखले ही आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टापुढे होईल. लवकर निकाल लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. याप्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Advertisement