
कोयता गँग, बनियन गँग ही नाव आपण ऐकली आहेत. त्यांचा धुमाकूळही पाहीला आहे. पुण्यात तर कोयता गँगची दहशत असते. कुठे ही आणि कधीही ही गँग दरोडा टाकते किंवा फोडतोड करते. आता आणखी एक गँग समोर आली आहे. ती म्हणजे गाऊन गँग. होय ही गाऊन गँग सध्या नाशिकच्या मालेगावमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यांनी आपली दहशत परिसरात निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिकच्या मालेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून गाऊन गँगने धुमाकूळ घालत आहे. ही गँग महिलांच्या गाऊन घालून चोऱ्या करत आहे. हे चोरटे गाऊन परिधान करुन शहरातील मंगलमूर्ती नगर, स्वप्नपूर्ती नगर, मोरया गणपती मंदिर परीसरात घरफोड्या केल्या आहेत. त्यावरच ते थांबले नाहीत. तर मंदिरातील दानपेटी ही या चोरांनी सोडलेली नाही. शहरातल्या मंदिरातही त्यांनी गाऊन घालून चोरी केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला
सध्या हे चोरीचे सत्र शहरात सुरू आहे. ही गाऊन गँग cctv मध्येही कैद झाली आहे. ही गँग फक्त गाऊन घालून दरोडा टाकत नाही तर त्यावेळी ते हातात धारधार शस्त्रही घेवूनही त्याचा धाक दाखवतात. सीसीटीव्ही मध्ये त्यांच्या हातात धारधार शस्त्र दिसत आहेत. या गाऊन गँगमुळे परिसरातील महिला, नागरिक भयभयीत झाले आहेत. पोलीसांनी या भागात गस्त वाढवावी. झालेल्या घरफोड्या तातडीने तपास करावा. गाऊन गँगला तत्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या गाऊन गँगचा धसका शहरातील लोकांनी घेतला आहे. चोरी करण्यासाठी हे चोर नवनव्या गोष्टी शोधून काढत आहेत. पोलीसांनी या गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप लावावा अशी मागणी आता होत आहेत. या घटनांमध्ये गेल्या काही दिवसापासून वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अशाच घटना होत राहील्या. कोणतीही कारवाई झाली नाही. तर मग या गँगला कोणताही धाक राहणार नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world