विधानसभा निवडणुकीची तयारी महायुतीने सुरू केली आहे. महायुतीतले तिनही प्रमुख पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी सभा मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. तर राष्ट्रवादीने जनसन्मान यात्राही सुरू केली आहे. विधानसभेच्या 288 मतदार संघात महायुतीत कोण कुठे लढणार? कोणाला कोणती जागा सुटणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पडाव्यात यासाठी महायुतीत सध्या रस्सीखेच सुरू आहे. भाजपने 125 प्लसचा नारा दिला आहे. तर आता अजित पवारांनीही किती जागा लढणार हे कार्यकर्त्यां समोरचं स्पष्ट केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि युवकांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना काय कराल याबाबत युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला किती जागा लढणार याबाबतही त्यांनी सर्वां समोर खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या 54 आमदार आहेत. तर दोन आमदारांचा पाठिंबा आहे. शिवाय काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. त्यामुळे 60 जागा ह्या आपल्याच आहेत. या जागांवर आपण लढणार हे निश्चित आहे.
ट्रेंडिंग बातमी - चॉकलेट चोरल्याचा संशय, तिसरीच्या मुलाला झाडाला बांधलं, पुढे मात्र...
त्यामुळे सद्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागांवर लढणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या शिवाय अन्य जागांवरही राष्ट्रवादीचा दावा आहे. त्याबाबत भाजप आणि शिवसेने बरोबर होणाऱ्या चर्चेनंतर मार्ग काढला जाईल. त्यामुळे सध्या तरी या 60 जागांवर तयारीला लागा असे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. जो मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार नाही. त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूच्या मतदार संघात ताकद द्यावी. राष्ट्रवादीचा उमेदवार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मदतीला जावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - Inside Story: श्रीधर नाईक यांची 30 वर्षापूर्वी हत्या अन् नारायण राणे
निवडणुकी दरम्यान आणि आधीही कार्यकर्त्यांनी जपून बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.विरोधकांच्या आरोपाला काही उत्तर देवू नका. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देवू नका असेही पवार यांनी यावेळी सांगितले. लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार नाही. जनतेसाठी सरकारने चांगल्या योजना दिल्या आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहचवा असेही अजित पवार म्हणाले. लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ द्या असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...
दरम्यान अजित पवार यांनी सध्या 60 जागा लढण्याचे सांगितले असले तरी जवळपास 90 ते 95 जागांवर राष्ट्रवादी दावा करणार आहे. तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अजित पवारांची अपेक्षा आहे. मात्र त्या पैकी किती जागा राष्ट्रवादीच्या पदरात जाणार हा खरा प्रश्न आहे. लोकसभेलाही अजित पवारांच्या पदरात मोजक्या जागा मिळाल्या होत्या. त्या पैकी केवळ एका जागेवरच अजित पवारांना विजय मिळवता आला. विधानसभेत भाजपनेही 125 जागांचे टार्गेट ठेवले आहे. तर शिंदे शिवसेनेनेही 100 जागा मिळाल्याच पाहीजेत असा सुर लावला आहे. दोन मित्र पक्षांची जागांची मागणी पाहात अजित पवारांच्या पारड्यात पन्नास ते साठ जागाच येण्याची दाट शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world