अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. एका मागून एक घटना घडत आहेत. त्यात गेल्या काही महिन्यापासून बदलापूरमध्ये या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. इथं एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्या ओढून तिला गर्भवती ठेवण्याचा प्रकार उघड झाला आहे. ती अवघ्या 16 वर्षाची आहे. तर हे कृत्य करणारा तिचा प्रियकर हा 20 वर्षाचा आहे. जेव्हा ही घटना मुलीच्या पालकांना समजली त्यावेळी त्यांच्या पाया खालची वाळू सरकली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर पूर्व मध्ये एक 16 वर्षाची तरुणी राहते. तिचं त्याच भागात राहणाऱ्या अभिषेक कांबळे या तरुणा बरोबर प्रेमसंबध होते. अभिषेक याचे वय 20 वर्ष आहे. प्रेम प्रकरणातून या दोघांमध्ये शरीर संबध निर्माण झाले होते. वारंवार झालेल्या शरीर संबधां मुळे मुलगी गर्भवती राहीली होती. पण तिच्या ते लक्षात आलं नाही. मात्र एक दिवस तिच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे ही बाब तिने आपल्या आईला सांगितली. खाण्या पीण्यात काही तरी झालं असेल म्हणून तिला दवाखान्यात नेण्यात आले.
दवाखान्यात तिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे उघड झालं. ही बाब डॉक्टरांनी तिच्या आई वडीलांना सांगितली. हे ऐकून घरचे पुर्ण पणे कोसळून गेले. त्यांनी काळजी पुर्वी हे प्रकरण हाताळण्याचे ठरवले. त्यांनी मुलीला विश्वासात घेतलं. तिला झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. मुलीने ही नंतर आपले अभिषेक कांबळे याच्या बरोबर प्रेम संबध होते. त्यातून आपण गर्भवती झाल्याचे तिने सांगितले.
या आधारावर मुलीच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलिस स्थानक गाठलं. तिथे जात त्यांनी झालेली हकीगत पोलिसांना सांगितली. शिवाय अभिषेक कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्या विरोधात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तातडीने अटक ही करण्यात आली. आरोपी विरोधात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.