जाहिरात

Narayan rane: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा भाई-दादांना ठेंगा? नारायण राणेंचे मोठे वक्तव्य

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र भाजप मुंबईत स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याबाबत अजूनही स्पष्टपणा नाही.

Narayan rane: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा भाई-दादांना ठेंगा? नारायण राणेंचे मोठे वक्तव्य
रत्नागिरी:

विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळालं आहे. त्यानंतर भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला लागलं आहे. त्यादृष्टीने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राज्यभर सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकां, पंचायत समिती बरोबर महापालिकांच्या निवडणुकाही पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र भाजप मुंबईत स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याबाबत अजूनही स्पष्टपणा नाही. या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महापालिका अनेक वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेना आणि मुंबई महापालिका हे एक समिकरण झाले आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्लाही समजला जातो. मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर हा बालेकिल्ला दुभंगला आहे. त्याचाच फायदा घेण्याच्या तयारीत भाजप आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका हिसकावून घेण्याच्या तयारीत भाजप आहे. त्या दृष्टीने रणनितीही आखली जात आहे. मुंबईत भाजपची  ताकद चांगली आहे. त्या तुलनेत महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांची ताकद कमी आहे. अशा वेळी भाजप मुंबई महापालिका स्वबळावर लढणार का? हा खरा प्रश्न आहे. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!

अशा वेळी खासदार नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. भविष्यात आम्ही स्वबळावर निवडणुका लढू. मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढू येवढी निश्चितच ताकद भाजपची आहे. असं सांगत त्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. शिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची गरज आहे. ते युती शिवाय लढू शकत नाहीत. त्यांना टेकूची गरज लागते. पण आम्हाला त्याची गरज नाही. तरी आम्ही काही मित्रांना सोबत घेतो. हा आमचा मोठेपणा आहे. असं बोलत त्यांनी शिंदे आणि अजित पवारांना सुचक इशाराच दिला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Larsen And Toubro : घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला

महायुतीमुळे अनेक इच्छुकांना विधानसभा निवडणूक लढता आली नाही. तयारी करूनही त्यांना युतीधर्म म्हणून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भाजप स्वबळावर लढणार आहे हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका निवडणुकही भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. मुंबईत भाजपच्या तुलनेत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची ताकद कमी आहे. तर मनसेला भाजप सोबत घेणार का ही बाबही गुलदस्त्यात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com