जाहिरात

Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण...

Badlapur News: बदलापूरमध्ये एका नवऱ्याला साडी घेऊन दिली नाही म्हणून एका  जीव गमवावा लागला आहे.

Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण...
Badlapur News: या भांडणाचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पना कुणीही केली नव्हती.
बदलापूर:

Badlapur News: बदलापूरमध्ये एका नवऱ्याला साडी घेऊन दिली नाही म्हणून एका  जीव गमवावा लागला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. राग अनावर झालेल्या पत्नीने थेट डोक्यात कुकर मारून आणि त्यानंतर गळा आवळून पतीचा गेम उडवला. हत्येनंतर पोलिसांनी भलत्याच कथानकात अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण एका निष्पाप चिमुकल्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या सत्याने या संपूर्ण गुन्ह्याचा बुरखा फाडला आहे.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय हरेराम सिंग हे शारीरिक अपंगत्वामुळे गेल्या काही काळापासून पूर्णपणे अंथरुणाला खिळलेले होते. ते त्यांची पत्नी सुनीता देवी आणि 7 वर्षांच्या मुलासोबत राहत होते. पतीच्या अपंगत्वामुळे आणि कौटुंबिक अडचणींमुळे या दोघांमध्ये वारंवार किरकोळ गोष्टींवरून खटके उडत असत. पण या भांडणाचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पना कुणीही केली नव्हती.

घटनेच्या दिवशी सुनीताने पतीकडे नवीन साडीची मागणी केली होती. मात्र, परिस्थिती आणि अपंगत्वामुळे पतीने साडी देण्यास असमर्थता दर्शवली. याच कारणावरून दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक उडाली. वादाच्या भरात सुनीताचा ताबा सुटला आणि तिने स्वयंपाकघरातील कुकर उचलून थेट पतीच्या डोक्यात घातला. एवढ्यावरच न थांबता, रक्तबंबाळ झालेल्या आणि असहाय्य अवस्थेत पडलेल्या नवऱ्याचा तिने गळा दाबून जागीच जीव घेतला.

( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )

मुलाच्या एका जबाबाने बिंग फुटले

पतीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पत्नीने स्वतःला वाचवण्यासाठी भलताच डाव आखला. तिने पोलिसांना फोन करून भ्रामक माहिती दिली आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना सुरुवातीपासूनच तिच्या सांगण्यावर संशय येत होता. 

अखेर पोलिसांनी तिच्या 7 वर्षांच्या मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केली. या चिमुकल्याने आपल्या डोळ्यांसमोर घडलेला सर्व प्रकार पोलिसांना जसाच्या तसा सांगितला आणि आईचा बनाव क्षणात उघडा पडला.

( नक्की वाचा : 'लग्नानंतरही माझ्या खोलीत यायची, तिच्या नवऱ्याला VIDEO देखील पाठवलाय,' IPS अधिकाऱ्याच्या चिठ्ठीनं प्रचंड खळबळ )

चिमुकल्याच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत सुनीता देवीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू केला आहे. एका साडीच्या वादातून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून निष्पाप चिमुकल्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com