होळीनंतर राज्यात धुळवड सगळीकडे खेळली गेली. रंगांचा हा सण उत्साहात साजरा केला जात होता. त्याच वेळी मात्र बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इतर शहरां प्रमाणे बदलापुरातही मोठ्या प्रमाणात धुळवड खेळली जात होती. त्यातल्या काही तरुणांनी धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी म्हणून उल्हास नदीकडे आपला मार्ग वळवला. तिथेच घात झाला आणि मोठी दुर्घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी म्हणून चार तरुण उल्हास नदीत गेले होते. पण नदीत उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा काही एक अंदाज आला नाही. एका मागो माग हे चार ही तरुणी नदीच्या पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आर्यन मेदर आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर अशी या चौघांची नावं आहेत. विशेष म्हणजे हे चौघे ही अवघ्या पंधरा सोळा वर्षांचे आहेत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Vasai News: होळी दहन करून घरी येत असताना मामा भाच्यावर काळाचा घाला
रंग काढण्यासाठी म्हणून ते उल्हास नदीच्या पात्रात उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आलाच नाही. ते पाण्याच्या प्रवाहात बुडत गेले. त्यांना वाचवण्यासाठी कुणी तिथे नव्हते. ही घटना बदलापूरच्या चामटोली परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि स्थानिक तरुणांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न ही त्यांनी सुरू केले. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
त्यांना वाचवण्यासाठी नदीत तरुण उतरले होते. पण त्यांच्या हाती चौघांचे मृतदेह लागले. हे मृतदेह त्यांनी नदी बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर मृत मुलांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. ऐन होळीच्या दिवशी अशी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण आहे. शिवाय लहान वयात या मुलांना या जगातून जावं लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.