Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि....

Badlapur Murder : बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर  ती सुनियोजित हत्या होती, असा धक्कादायक खुलासा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Badlapur Murder : तब्बल 3 वर्षांनी या प्रकरणाचं सत्य उघड झालं आहे.
मुंबई:

Badlapur Murder : बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर  ती सुनियोजित हत्या होती, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. एका दुसऱ्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीने दिलेल्या माहितीमुळे हा जुना खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. इतकेच नाही, तर या हत्येमध्ये नीरजा यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या कुळगांव-बदलापूर सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचीही आता चौकशी केली जाणार आहे.

कशी फुटली हत्येला वाचा?

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान त्यांनी ऋषिकेशला 'तू आणखीन काय केले आहेस ?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केला, ज्यामुळे पोलीस चक्रावून गेले.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )

नैसर्गिक मृत्यूचा बनाव

ऋषिकेशने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी (सन 2022 मध्ये) काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा जो मृत्यू झाला होता, तो आकस्मिक नसून त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येचा कट नीरजाचा पती आणि व्यावसायिक रुपेश आंबेकर याने रचला होता. त्यावेळी पोलिसांनी या मृत्यूची एडीआर (Accidental Death Report) दाखल केली होती, परंतु तपासात कोणताही सुगावा किंवा संशयित आरोपी न मिळाल्याने हे प्रकरण पुढे सरकले नव्हते.

Advertisement

सर्पदंश देऊन संपवले

ऋषिकेशच्या कबुलीनुसार, नीरजा यांचा पती रुपेश आंबेकर याने तीन साथीदारांच्या मदतीने त्यांची हत्या केली होती. या हत्येमध्ये सर्पदंशाचा वापर करण्यात आला होता. 2022 मध्ये रुपेश,चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चौघांनी मिळून हा कट अंमलात आणला होता. हत्येच्या आधी रुपेशने घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवला होता.

( नक्की वाचा : Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी )
 

हत्या करण्याच्या रात्री, नीरजा यांच्या पायाची मालिश करण्याच्या बहाणाने त्यांना हॉलमध्ये पालथे झोपवण्यात आले. कुणाल चौधरी याने नीरजा यांच्या पायाला मालिश करायला सुरुवात केली. याच वेळी चेतन दुधाने (जो सर्पमित्र आहे) याने किचनमध्ये ठेवलेला साप स्टीकच्या मदतीने बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला. नीरजा हॉलमध्ये झोपलेल्या असताना आणि त्यांच्या पाठीवर रुपेश आंबेकर बसलेला असताना, ऋषिकेश चाळके याने नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ त्या सापाकडून तीन वेळा दंश करवून त्यांची हत्या केली.

Advertisement
Topics mentioned in this article